Asia Cup 2023: पराभवानंतर अफगाणिस्तानच्या राशिद खानला अश्रू अनावर; भर मैदानात रडतानाचा व्हिडीओ व्हायरल
Asia Cup 2023: जिंकण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या अफगाणिस्तानच्या टीममधील खेळाडूंना पराभवानंतर अश्रू अनावर झाले होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Asia Cup 2023: एशिया कपमध्ये ( Asia Cup 2023 ) कपमध्ये मंगळवारी श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान ( Sri Lanka vs Afghanistan ) यांच्यामध्ये सामना रंगला होता. श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यामध्ये अफगाणिस्तानचा अवघ्या 2 रन्सने पराभव झाला. या विजयासह श्रीलंकेची टीम सुपर 4 चं तिकीट मिळवू शकली आहे. जिंकण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या अफगाणिस्तानच्या टीममधील खेळाडूंना पराभवानंतर अश्रू अनावर झाले होते. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
लाहोरच्या गद्दाफी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 292 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. सुपर 4 गाठण्यासाठी अफगाणिस्तानला 37.1 ओव्हर्समध्ये गाठायचं होतं. या थरारक सामन्यात 2 रन्सने अफगाणिस्तानचा पराभव झाला. या अफगाणिस्तानच्या खेळाडूंना अश्रू आवरता आले नाहीत.
शेवटच्या 5 मिनिटांत बदलला खेळ
बांगलादेशाने आधीच एशिया कप 2023 सुपर-4 मध्ये गट-ब मधून आपले स्थान निश्चित केलंय. अशा स्थितीत अफगाणिस्तानला विजय मिळवून चांगल्या रन रेटने सामना जिंकावा लागणार होता. श्रीलंकेने दिलेलं लक्ष्य अफगाणिस्तान टीमला 38.1 ओव्हर्समध्ये लक्ष्य गाठणं आवश्यक होतं. 37व्या ओव्हरमध्ये 16 रन्सची गरज होती. ज्यामध्ये राशिद खानने 3 फोर मारून 1 बॉलमध्ये 3 रन्स असं समीकरण केलं होतं. मात्र यावेळी दुसऱ्या टोकाला उपस्थित असलेला मुजीब उर रहमान बाद झाला.
मैदानावर रडायला लागला राशिद
विकेट गेल्यानंतरही अफगाणिस्तानला ( Sri Lanka vs Afghanistan ) 2 बॉल्समध्ये 4 किंवा 6 रन करण्याची संधी होती. पण फलंदाज फारुकीही बाद झाला. यानंतर नॉन स्ट्राईक एंडला उभा असलेला रशीद खान मैदानात ढसाढसा रडू लागला. यावेळी अफगाणिस्तानच्या ड्रेसिंग रूममध्येही खेळाडूंना अश्रू अनावर झाले होते. आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सुपर 4 चं चित्र स्पष्ट
अशातच आता सुपर 4 चं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता आगामी 6 सामन्यांचा थरार रंगणार आहे. ग्रुप स्टेजमधून भारत आणि पाकिस्तानने सुपर-4 साठी क्वालिफाय केलंय. तर दुसऱ्या ग्रुपमधून श्रीलंका आणि बांगलादेश यांना सुपर 4 चं तिकीट मिळालंय.
सुपर 4 मधील सामने-
पाकिस्तान विरुद्ध बांग्लादेश (PAK vs AFG) - 6 सप्टेंबर
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश (SL vs BAN) - 9 सप्टेंबर
भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) - 10 सप्टेंबर
भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) - 12 सप्टेंबर
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका (PAK vs SL) - 14 सप्टेंबर
भारत विरुद्ध बांग्लादेश (IND vs BAN) - 15 सप्टेंबर
फायनल सामना - 17 सप्टेंबर