ODI World Cup 2023: 'चिन्नास्वामी मुथुस्वामी वेणुगोपाल अय्यर...' हे वाचून तुम्हाला नक्कीच धमाल सिनेमातील दिवंगत विनय आपटे यांची आठवण आली असेल. दाक्षिणात्य नावं म्हटलं की, अनेकांना ती उच्चारणं कठीण जातं आणि अशातच विदेशी खेळाडूंना या नावांचा उच्चार जमणं म्हणजे कठीणच काम. अशीच काहीशी पंचायत झाली ती दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंची. 'तिरुवनंतपुरम' शब्दाचा उच्चार करताना आफ्रिकेच्या खेळाडूंची बोबडी वळली आहे. दरम्यान याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून चाहते मात्र मजा घेतायत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतात 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप 2023 ला ( ODI World Cup 2023 ) सुरूवात होणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. 2023 च्या वर्ल्डकपपूर्वी ( ODI World Cup 2023 ) दक्षिण आफ्रिकेची टीम केरळची राजधानी तिरुअनंतपुरममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम सोमवारी 2 ऑक्टोबर रोजी तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप 2023 ( ODI World Cup 2023 ) चा सराव सामना खेळणार आहे.


'तिरुवनंतपुरम' बोलण्यात आफ्रिकेच्या खेळाडूंच्या नाकीनऊ


सोशल मीडियावर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये त्यांना 'तिरुवनंतपुरम' असा उच्चार करणं कठीण जाताना दिसतंय. तिरुवनंतपुरममधील काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. शशी थरूर यांनी ही पोस्ट शेअर करून दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंची मजा घेतली आहे.


व्हिडिओ शेअर करताना शशी थरूर यांनी म्हटलंय की, 'दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेटपटू तिरुवनंतपुरममध्ये आले आहेत. पण ते कुठे आहेत ते कुणाला सांगू शकतील का?' 


शशी थरूर यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर चाहते त्यांच्या प्रतिक्रिया नोंदवताना दिसतायत. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, दक्षिण आफ्रिकेचा रॅसी व्हॅन डर डुसेन, डेव्हिड मिलर आणि अँडिले फेहलुकवायो यांच्यासह टीममधील इतर खेळाडू खूप प्रयत्न करूनही तिरुअनंतपुरमचा उच्चार बरोबर करता आला नाही. मात्र कागिसो रबाडा, केशव महाराज आणि लुंगी न्गिडी यांनी काही प्रमाणात 'तिरुवनंतपुरम' हा उच्चार करणं जमलं आहे. 



वर्ल्डकपसाठी कशी आहे आफ्रिकेची टीम?


टेम्बा बावुमा, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, रॅसी व्हॅन डर डुसेन, मार्को जॅन्सेन, अँडिले फेहलुकवायो, क्विंटन डी कॉक, हेनरिक क्लासेन, गेराल्ड कोएत्झी, केशव महाराज, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा, टॅब्राझ विल्यम्स, लिबार्ड्स.