मुंबई : आयपीएलचा 15 सिझन सुरु होण्यासाठी अवघे काही दिवसच उरले आहे. 26 तारखेपासून आयपीएलचा डंका वाजणार आहे. यंदाची आयपीएल फार रोमांचक होणार आहे, कारण यंदाच्या सिझनमध्ये 8 नव्हे तर 10 टीम्सचा समावेश असणार आहे. दरम्यान अशातच एक खेळाडू असा आहे, जो आयपीएलमध्ये 11 वर्षांनी कमबॅक करणार आहे. 


11 वर्षांनी आयपीएलसाठी उतरणार हा खेळाडू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा घातक विकेटकीपर मॅथ्यू वेड तब्बल एका दशकानंतर आयपीएलमध्ये कमबॅक करणार आहे. वेड यंदा गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे. 2011 साली मॅथ्यू वेड शेवटचं आयपीएल खेळला होता. 


2011 सालचा आयपीएल सिझन मॅथ्यू वेडसाठी काही खास राहिला नाही. त्यावेळी तो केवळ 3 सामने खेळू शकला होता. या तिन्ही सामन्यांमध्ये मॅथ्यूला 22 रन्स करता आले होते. मात्र आता वेडच्या फलंदाजीमध्ये फार बदल झाले असून तो टीमसाठी मोलाची भूमिका बजावू शकतो. 


गुजरात टायटन्स दिले इतके कोटी


यंदाच्या मेगा ऑक्शनमध्ये मॅथ्यू वेड खूप चर्चेत होता. गुजरात टायटन्सने त्याला 2 कोटींची बोली लावून आपल्या ताफ्यात घेतलं. आयपीएलची एवढी मोठी डील मिळाल्यानंतर त्याने इंग्लंडच्या काऊंटी क्रिकेटला रामराम केला.