नवी दिल्ली : इंडिया आणि श्रीलंका यांच्यात तिसरी टेस्ट मॅच सध्या सुरू आहे. त्यानंतर १० डिसेंबरला वनडे सिरीज असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वन डे सिरीजची दुसरी मॅच मोहालीमध्ये १३ डिसेंबरला होणार आहे.


हा सामना एका 'धोनी'च्या रिटायरमेंटचा साक्षीदार असणार आहे. 


एक धोनी नक्कीच रिटायर्ट 


पण जरा थांबा..आम्ही त्या धोनीविषयी सांगत नाही ज्याचा विचार तुम्ही करताय. टीम इंडियाचा माजी कॅप्टन एमएस धोनी इंटरनॅशनल क्रिकेटमधून कधी रिटार्टमेंट घेणार हे त्यालाच माहीती आहे.


पण मोहालीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या १३ डिसेंबरच्या वन डे नंतर एक धोनी नक्कीच रिटायर्ट होणार आहे. 


अखेरचा दिसणार 


 तो धोनी आहे मोहाली पोलिसांचा स्निफर डॉग धोनी. गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत असलेला लॅब्राडोर जातीचा कुत्रा श्रीलंकेविरूद्धच्या मॅचदरम्यान अखेरचा दिसणार आहे. 


अजून दोघांची रिटार्यटमेंट


 इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, मोहाली पोलिसांनी या डॉगचा निरोप समारंभ ठेवला आहे. धोनीसोबत असून दोन स्निफर डॉग प्रिती आणि जॉनदेखील त्याच दिवशी रिटायर्ट होणार आहेत. 


बोली लागणार 



(फोटो कर्टसी-इंडियन एक्सप्रेस) 


निवृत्तीनंतर या दत्तकही देण्यात येणार असून यासाठी बोली लावण्यात येईल. या बोलीसाठी धोनीची मूळ किंमत ८०० रुपये ठेवली आहे.


हाय प्रोफाईल प्रकरणात मदत 


 फेब्रुवारी २००७ मध्ये पोलीस डॉग स्क्वॉडमध्ये सामील झालेल्या धोनीने खूप हायप्रोफाइल प्रकरणात सेवा दिली आहे. यामध्ये डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांना शोधण्याचे प्रकरणही येते.