मुंबई : भारतीय क्रिकेट टीममध्ये मुस्लिम खेळाडू का नाही, असा सवाल माजी आयपीएस अधिकारी संजीव भट यांनी विचारला होता. संजीव भट यांच्या या वक्तव्याचा क्रिकेटपटू हरभजन सिंगनं समाचार घेतला होता. यानंतर आता आरपी सिंगनेही संजीव भट यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही १२५ कोटी देशवासियांचं प्रतिनिधीत्व करतो. जात, धर्म, रंग, भेद प्रत्येकवेळी बाऊंड्री लाईनच्या बाहेर राहिले आहेत आणि यापुढेही राहतील. जय हिंद, जय भारत असं ट्विट आरपी सिंगनं केलं आहे.



 


त्याआधी हरभजन सिंगनंही भट यांच्या वक्तव्यावर टीका केली होती. हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई भाऊ-भाऊ आहेत. क्रिकेट टीममध्ये खेळणारा प्रत्येक खेळाडू हिंदूस्तानी आहे. त्याची जात किंवा धर्म आड येता कामा नये, असं हरभजन म्हणाला होता.



 


मुस्लिमांनी क्रिकेट खेळणं सोडून दिलं आहे का? भारतीय क्रिकेट टीममध्ये कोणी मुस्लिम खेळाडू आहे का? स्वातंत्र्यानंतर असं किती वेळा झालंय की भारतीय क्रिकेट टीममध्ये एकही मुस्लिम खेळाडू नाही, असं ट्विट संजीव भट यांनी केलं होतं.