Pm Narendra Modi Visit Team India Dressing Room : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगलेल्या वर्ल्ड कपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा पराभव केला. 6 विकेट राखून या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने सहा वेळा वर्ल्ड कपवर नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाच्या या विजयानंतर भारताचं तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्याचं विजयाचं स्वप्न भंगलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने केलेल्या दारूण पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांना मैदानावरच अश्रू अनावर झाले होते. अशातच यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी टीम इंडियाच्या (Team India) ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंची भेट घेतली होती. यावेळी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन पंतप्रधानांनी टीम इंडियाच्या खेळाडूंना काय खास मेसेज दिला ते पाहूयात.


टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये एन्ट्री घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे पोहोचले. यावेळी दोघांचाही हात पकडून पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही 10 सामने जिंकला आहात, ( पराभव ) असं होत राहतं. थोडं हसा, संपूर्ण देश तुम्हाला पाहतोय.


यानंतर पंतप्रधान मोदींनी रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल यांच्याशी हात मिळवून त्यांचं मनोधेर्य वाढवलं. ड्रेसिंग रूममधील सर्व खेळाडूंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या. 



फायनल सामन्यात टीम इंडियाचा पराभव


टीम इंडियाने वर्ल्ड कपच्या लीग स्टेजमध्ये 10 पैकी 10 सामने जिंकले होते. 11 वा सामना हा फायनलचा सामना होता आणि या अतिमहत्वाच्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माला पव्हेलियनमध्ये परतत असताना अश्रू अनावर झाले होते. या संबंधित फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. 


ऑस्ट्रेलियाने केलेल्या पराभवानंतर पंतप्रधानांनी ड्रेसिंग रूममध्ये जाऊन सर्वच खेळाडूंची भेट घेतली. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही वरिष्ठ खेळाडूंनी त्यांनी धीर दिला.