T20 World Cup: टीम इंडियाला धक्क्यावर धक्के; बुमराह, जडेजानंतर आणखी एक मॅचविनर दुखापतग्रस्त?
T20 World Cup आधी टीम इंडियाला तिसरा धक्का
Team India : आगामी T20 World Cup आधी टीम इंडियाची लिटमस टेस्ट पार पडत आहे. भारत आणि साऊथ अफ्रिकेमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेत भारतीय खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहे. अशातच आता टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. आधीच भारतीय संघाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) जखमी असल्याने भारतीय गोलंदाजी कमकूवत झाली आहे. तर रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) देखील संघाबाहेर असणार आहे, त्यामुळे भारतीय गोलंदाजांची कसोटी लागणार आहे.
आपल्या दमदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर दीपक हुडाने (Deepak hooda) भारतीय संघात आपले स्थान निश्चित केलं होतं. पण हुड्डाला पाठीची दुखापत झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता हुड्डा वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही, यावर अद्याप शिक्कामोर्तब झालं नाही. हुड्डाच्या (Deepak Hooda Injured) दुखापतीमुळे टीम इंडियाला धक्क्यावर धक्के बसले आहेत. हार्दिक पांड्याच्या बरोबरीचा खेळाडू म्हणून हुड्डाकडे पाहिलं जात होतं. निवडकर्त्यांचा हुड्डाने विश्वास देखील कायम ठेवला होता.
दीपक हुड्डा हा टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू ठरू शकतो. अनेकदा त्याने ही कामगिरी करून देखील दाखवली आहे. दुखापत झाल्याने हुड्डा साऊथ अफ्रिकेविरूद्ध (INDvsSA) खेळणार नाही. पण विश्वचषकापर्यंत तो फिट होणार की नाही, याबाबत बीसीसीआयने कोणतीही माहिती दिली नाही.
दरम्यान, बुरराहच्या दुखापतीनंतर मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलं. मात्र, हुड्डानंतर त्याची रिप्लेस्मेंट खेळाडू कोण असेल, यावर आता क्रिडाविश्वास चर्चा होताना दिसत आहे. हुड्डा फिट होणार नसेल तर त्याच्या जागी कोणत्या खेळाडूला संघात स्थान द्यायचे, याचा विचार भारतीय संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयला करावा लागेल.
"टीम इंडियाला रोहित, विराट नाहीतर 'हा' खेळाडू जिंकून देणार टी-20 वर्ल्ड"