मुंबई : बीसीसीआयने टी 20 विश्वचषक 2021 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील या संघात भारताच्या 15 सर्वोत्तम खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. तर तीन खेळाडूंना राखीव ठेवण्यात आले आहे. पण 15 खेळाडूंच्या या संघात काही अनुभवी क्रिकेट खेळाडूंसाठी जागा करण्यात येऊ शकली असती, परंतु सिलेक्टर्सनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवणे योग्य मानले.


हा खेळाडू बाहेर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्टार फलंदाज श्रेयस अय्यरला भारताच्या टी -20 विश्वचषक संघातून वगळण्यात आले आहे. अय्यर वर्ल्ड कपसाठी राखीव ठेवलेल्या तीन खेळाडूंपैकी एक आहे, पण त्याला मुख्य संघात स्थान देण्यात आले नाही. या वर्षाच्या सुरुवातीपर्यंत तो संघासाठी कायम नंबर 4 वर फलंदाजी करत होता, परंतु इंग्लंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान त्याला मोठी दुखापत झाल्याने तो बराच काळ संघाबाहेर होता. यानंतर सूर्यकुमार यादव याने अय्यरची जागा घेतली आणि त्यांनीही आता त्याने संघात आपले स्थान निश्चित केलं आहे.


अय्यर कर्णधारपदाचा दावेदार


आयपीएलमध्ये सातत्याने आपल्या संघाला यशाकडे नेणारा श्रेयस अय्यर हा एकेकाळी भारतीय संघाचा कर्णधार होण्यासाठी मोठा दावेदार होता. खरं तर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर भारताकडे फक्त केएल राहुल आणि श्रेयस अय्यर हे कर्णधारपदाचे मोठे दावेदार होते. परंतु सध्याच्या काळात अय्यरला संघात आपले स्थान निर्माण करणे देखील कठीण जात आहे.


त्याचबरोबर आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद त्याच्या जागी युवा विकेटकीपर ऋषभ पंत याला देण्यात आले. गेल्या वर्षी अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली संघाने आयपीएल फायनलपर्यंत प्रवास केला होता.


दुखापतीनंतर बाहेर


सूर्यकुमार संघात येण्यापूर्वी अय्यर टीममध्ये खेळत होता. पण इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत अय्यरला दुखापत झाली, ज्यामुळे त्याला बरे होण्यास बराच वेळ लागला.


सध्याची परिस्थिती पाहता असे दिसते की, खुद्द कर्णधार विराट कोहली अय्यरपेक्षा सूर्यकुमार यादववर जास्त विश्वास ठेवतो. यामागील एक मोठे कारण म्हणजे सूर्यकुमारने आयपीएलमध्ये भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्ससाठी चांगली कामगिरी केली आहे.