मुंबई : रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये इंडिया लेजेंड्सतर्फे खेळलेल्या तीन भारतीय क्रिकेटपटूंना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. माजी भारतीय फलंदाज एस. बद्रीनाथला देखील कोरोनाची लागण झाल्याचं पुढे आलं आहे. अशाप्रकारे, गेल्या दोन दिवसांत रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज स्पर्धेत संक्रमित झालेला तो तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रविवारी एस बद्रीनाथ म्हणाला की, त्याची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. सध्या तो घरीच क्वारंटाईन आहे. रायपूर येथे झालेल्या  स्पर्धेत बद्रीनाथच्या आधी सचिन तेंडुलकर आणि माजी अष्टपैलू युसुफ पठाण यांनाही शनिवारी कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हे खेळाडू आता आपापल्या घरी पोचले आहेत.


बद्रीनाथने आपल्या ट्विटरवर याबाबत माहिती दिली. 



सचिन तेंडुलकरानंतर, आणखी दोन क्रिकेटर्स कोरोना संक्रमित झाल्याचे समजल्यानंतर, आता सर्व क्रिकेटर्सची कोरोना टेस्ट होणार आहे. ज्यांनी रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजच्या फायनलमध्ये भाग घेतला होता. अगदी श्रीलंका संघाच्या क्रिकेटपटूंनी देखील सचिन तेंडुलकर आणि बाकीच्या खेळाडूंची भेट घेतली होती. अशा परिस्थितीत त्यांना कोरोना विषाणूची लागण झाली का हे देखील पाहावं लागेल.