मेलबर्न : प्रसिद्ध क्रिकेटर शेन वॉर्न आता आपल्यासोबत या जगात नाही. वयाच्या 52 व्या वर्षी त्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी सायंकाळी जेव्हा ही घटना घडली तेव्ही शेन आपल्या थायलंडमधील व्हिलामध्ये सुट्टी घलवत होता. त्यादरम्यान तो त्याच्या मित्रांना आणि मॅनेजरला बेशुद्ध अवस्थेत सापडला. ज्यानंतर त्याला आधी त्यांनी सीपीआर दिला. परंतु नंतर त्यांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. ज्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. ज्यामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात शोककळा पसरली. सचिन तेंडुलकरपासून ते ब्रायन लारापर्यंत सर्वांनी त्याच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. वॉर्नच्या कुटुंबाला व्हिक्टोरियन सरकारने राज्य सन्मान देण्याचेही ठरवले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेन वॉर्नचे कौटुंबिक जीवन बरेच वादग्रस्त होते. परंतु याचा परिणाम त्याच्या मुलांवर झाला नाही. शेनचा मुलगा  जॅक्सन वॉर्न 23 वर्षांचा आहे आणि त्याला त्याच्या वडिलांचा अभिमान असल्याचेही त्याने सांगितले. जॅक्सनला समर आणि ब्रूक या दोन बहिणीही देखील आहेत.


खरेतर 2007 मध्येच वॉर्न  त्याच्या बायकोपासून वेगळा झाला होता. ज्यानंतर त्याने  ब्रिटीश अभिनेत्री लिझ हर्ले हिच्याशीही साखरपूडा केला होता. परंतु हे नातं देखील फार काळ टिकू शकलेलं नाही.


वडिलांच्या मृत्यूनंतर जॅक्सन काहीही बोलला नाही, पण अलीकडेच त्याने चॅनल 7 शी बोलताना आपल्या वडिलां विषयीच्या भावना व्यक्त केल्या होता.


त्याने मीडियासोबत बोलताना सांगितले की, 'माझं आयुष्य खूप निराशाजनक आहे. मी कुठेही गेलो तरी, लोक म्हणायचे तू शेन वॉर्नचा मुलगा जॅक्सन आहेस? परंतु लोकांनी मला कधीही फक्त जॅक्सन म्हणून पाहिले नाही. मला फक्त जॅक्सन व्हायचे आहे.'' 


पुढे तो म्हणाला की, 'मला माझ्या वडिलांना फक्त वडिलांच्या रूपात बघायचे आहे. मला त्यांची इतर कोणत्याही पालकांशी तुलना करायची नाही. मला फक्त त्यांना हसताना बघायचे आहे. मला वाटते की, त्यांनी खूप चांगले काम केले आहे आणि मला त्याचा अभिमान आहे.''


वडिलांमुळे सुरुवातीला खूप त्रास झाला असला तरी मी आता फार आनंदी आहे आहे त्याच्या मुलाने सांगितले.


शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने फक्त एवढेच सांगितले की,'आम्ही सध्या शॉकमध्ये आहोत आणि आम्हाला काहीही सुचत नाहीय.' त्यांच्या या वक्तव्यावरून त्यांच्यावर काय परिस्थीती ओढावली आहे, याचा आपण अंदाजा लावू शकतो.