RR vs KKR: पावसानंतर स्पंजने कोरडं केलं मैदान; गुवाहाटीमध्ये BCCI च्या व्यवस्थेची पोलखोल

RR vs KKR Rain IPL 2024: रविवारी संध्याकाळी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार होता. मात्र पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. अशातच पावसाने व्यवस्थेचा मात्र पर्दाफाश केला.
RR vs KKR Rain IPL 2024: गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या सामन्यांमध्ये पावसाचा व्यत्यय दिसून येतोय. रविवारी आयपीएलमधील लीग स्टेजमधील शेवटचा सामना होता. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना होऊ शकला नाही. राजस्थान रॉयल्स विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना न झाल्याने दोन्ही संघाना एक-एक पॉईंट देण्यात आला. मात्र यावेळी पावसानंतर मैदानावर एक विचित्र चित्र पहायला मिळालं.
रविवारी संध्याकाळी राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार होता. मात्र पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही. अशातच पावसाने व्यवस्थेचा मात्र पर्दाफाश केला. गुवाहाटीमध्ये पाऊस पडल्यानंतर मैदान सुकवण्यासाठी स्पंजचा वापर करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर केला जातोय. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतायत.
राजस्थान आणि कोलकाता यांच्यातील सामना बारसापारा स्टेडियमवर होणार होता. मात्र रविवारी पावसामुळे हा सामना सुरू होऊ शकला नाही. पावसामुळे मैदानात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. साधारणपणे मैदानात साचलेलं पाणी काढण्यासाठी मशिन्सचा वापर केला जातोय. मात्र यावेळी स्पंजच्या सहाय्याने ग्राऊंड वाळवलं जात होतं. त्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. सोशल मीडिया युझर्सने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला ट्रोल केलं.
राजस्थान आणि कोलताना सामन्यासाठी कट-ऑफ टाईम देखील देण्यात आला होता. हा सामना रात्री 10.56 पर्यंत प्रत्येकी 5 ओव्हर्स खेळवण्यात येणार होते. मात्र तसंही होऊ शकलं नाही. अखेरीस हा सामना रद्द करण्यात आला.
गुवाहाटी येथे होणारा राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR vs RR) यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दोन्ही संघांना एक एक गुण दिल्यानंतर आता प्लेऑफमधील शेडयुल फिक्स झालंय. पहिला क्वालिफायर सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. हा अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 21 मे रोजी खेळवला जाईल. तर एलिमिनेटर सामना हा राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. 22 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरच खेळवला जाईल.
यानंतर क्वालिफायर वनमधील पराभूत संघ आणि एलिमिनेटरचा विजयी संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात भिडतील. दुसरा क्वालिफायर सामना बंगळुरूच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 24 मे रोजी हा सामना होईल. तर आयपीएलचा फायनल सामना हा 26 मे रोजी बंगळुरूच्या चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे.