दुबई : टीम इंडियाने (Team India) आयसीसी टी-20 विश्वचषक 2021  (ICC T20 World Cup 2021) मध्ये स्कॉटलंड  (Scotland) विरुद्ध झंझावाती पद्धतीने 8 गडी राखून विजय मिळवला आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्कॉटलंडच्या ड्रेसिंग रूममध्ये विराट-रोहित


टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यासह सर्व भारतीय क्रिकेटपटू, सुपर 12 टप्प्यात स्कॉटलंडविरुद्धच्या शानदार विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये स्कॉटिश खेळाडूंसोबत दिसले.



विराट-रोहितचा व्हिडिओ आला समोर 


विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी स्कॉटिश क्रिकेटर्ससोबत त्यांचे अनुभव शेअर केले, याशिवाय जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) यांनी स्कॉटिश खेळाडूंना त्यांच्या ड्रेसिंगबद्दल विचारले. ते रूममध्ये बोलताना दिसले.



क्रिकेट स्कॉटलंडने विराटसाठी काय म्हटलं?


क्रिकेट स्कॉटलंडने ट्विट केले, 'विराट कोहली आणि संघाच्या प्रति सन्मान ज्यांनी वेळ काढला. अमूल्य.' 


टीम इंडियाचा पुढचा सामना 8 नोव्हेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर नामिबियाविरुद्ध रंगणार आहे.