T20 वर्ल्डकप जिंकून वेस्ट इंडिजहून परतल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) भारत सोडून लंडनला स्थायिक झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लंडनमध्ये भजन कीर्तिनमध्ये रमतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता सोशल मीडियावर रोहित शर्माही (Rohit Sharma) भारत सोडून जाणार असल्याची बातम्यांना वेग आलााय. 


रोहित शर्मा कुटुंबासह 'या' देशात होणार शिफ्ट? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर सुरू असलेल्या बातम्यांनुसार, रोहित शर्मा अमेरिकेत जाऊन स्थायिक होणार आहे. तो न्यूयॉर्कमध्ये राहणार असल्याची बातमी वाऱ्यासह पसरलीय. मात्र याबाबत अधिकृत काहीही पुष्टी मिळालेली नाही. रोहितबाबत समोर येत असलेला येत असलेल्या बातम्या काही दिवसांपूर्वी विराट कोहलीबाबत समोर आलेल्या बातम्यासारखाच आहे. या बातम्यांमध्ये कितीही तथ्य आहे याबद्दल अजून पुष्टी मिळालेली नाही. (After Virat Kohli will Rohit Sharma also leave India and Shift to new york with family) 


'या' कारणामुळे रोहित न्यूयॉर्कमध्ये स्थायिक होणार?


आता प्रश्न असा आहे की जर रोहित शर्मा न्यूयॉर्कला जाऊन सेटल होण्याचा विचार करत असेल तर त्याचं कारण काय असू शकतं?. याबाबत सध्या तरी स्पष्टपणे काहीही सांगता येणार नाही. पण होय, त्याने तेथे सुरू केलेल्या अनेक क्रिकेट अकादमींशी एक लिंक नक्कीच जोडली मात्र जातंय. पण त्यात किती ताकद आहे, याबाबत थेट काहीही सांगता येणार नाही. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये रोहित भारत सोडून न्यूयॉर्कमध्ये स्थायिक होणार असा अहवाल सादर केलाय.


टी-20 विश्वचषक जिंकून टीम इंडिया वेस्ट इंडिजमधून भारतात परतल्यानंतर विराट कोहली कुटुंबासह लंडनला परतला, तेव्हा सोशल मीडियावर या बातम्यांनी जोर पकडला की विराट कोहली आता लंडनमध्ये स्थायिक होणार आहे. यामागचे कारण विराट कोहलीची स्टारडमच्या जीवनापासून दूर राहण्याची इच्छा असल्याचे सांगितलं जात होतं.



ही बातमी समोर आल्यानंतर विराट आणि अनुष्काचे लंडनमधूनही अनेक फोटो समोर आलंय. मात्र विराट लंडनमध्ये स्थायिक होणार की नाही याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. तसंच आम्ही या संदर्भात कोणत्याही दाव्याने काहीही बोलत नाही. सध्या या सर्व गोष्टी सोशल मीडियावर आधारित आहेत. 


अशा स्थितीत जोपर्यंत विराट आणि रोहितकडून या गोष्टी स्पष्ट होत नाहीत, तोपर्यंत हे दोन्ही क्रिकेटपटू भारताबाहेर स्थायिक होणार आहेत की त्याबाबत विचार करत आहेत, हे निश्चितपणे सांगता येणार नाही.