मुंबई : आरसीबी आणि मुंबई इंडियन्स दरम्यान 28 ऑक्टोबरच्या हाय-व्होल्टेज सामन्यात विराट कोहलीने सूर्यकुमार यादवविरूद्ध नकारात्मक रणनीती वापरली. विराट सूर्यकुमारच्या जवळ यायचा आणि त्याच्याकडे रागाने पाहत होता. पण सूर्यकुमार यादव विचलित झाला नाही. त्याने आरसीबीच्या कर्णधारांच्या स्लेजिंगकडे दुर्लक्ष केले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमार यादवने 43 बॉलमध्ये 10 फोर आणि 3 सिक्ससह नाबाद 79 धावांची खेळी केली. ज्यामुळे मुंबई संघाचा विजय झाला. सूर्यकुमारने कोहलीकडे पाहिले आणि विचारले, 'सर्व काही ठीक आहे ना?'



कोहलीची ही वागणूक अनेक क्रिकेट चाहत्यांना आवडली नाही, तर अनेकांनी सूर्यकुमारच्या संयमाचे कौतुक केले. या घटनेनंतर सूर्यकुमारची काही जुनी ट्विट व्हायरल होत आहेत. ज्यात तो विराटची स्तुती करताना दिसत आहेत. सूर्यकुमार याने 2016 मध्ये एक ट्विट केले होते, ज्यात तो म्हणाला होता की, 'जिथे खूप जबाबदारी आणि दबाव असतो. तेथे मी देवाला टीम इंडियासाठी तिसऱ्या क्रमांकावर खेळताना पाहिले आहे.'



यापूर्वी, विराटबद्दल सूर्यकुमार याने आणखी एक ट्विट केले होते, 'यशाच्या शिखरावर पोहोचण्याच्या त्याच्या प्रवासासाठी एक शब्द- कोणी आहे? या ट्विटमध्ये त्याने विराटचे 2 फोटो शेअर केले होते, हे दोन्ही फोटो जेव्हा वनडे आणि कसोटी क्रिकेटमध्ये तो बॅटींग करत आहे.'



सूर्यकुमारने आतापर्यंत या आयपीएल हंगामात चमकदार कामगिरी केली आहे, तरीही ऑस्ट्रेलिया दौर्‍यासाठी त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली नाही. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केल्याबद्दल त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देखील मिळाला.