Aiden Markram On IND vs SA Final : गेल्या 13 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी टीम इंडिया आज मैदानात उतरणार आहे. भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यात आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची फायनल खेळवली (India vs South Africa T20 World Cup Final) जाणार आहे. अशातच आता पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकण्यासाठी साऊथ अफ्रिकेचा संघ आज जिवाची बाजी लावेल. दोन्ही संघ यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये अजिंक्य असल्याने आता फायनल सामना अधिकच रंगतदार असणार की काय? असा सवाल विचारला जातोय. अशातच आता साऊथ अफ्रिकेचा कॅप्टन एडन मार्करमने (Aiden Markram) टीम इंडियाला इशारा दिला.


काय म्हणाला Aiden Markram ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कोणी जिंकेल तर कोणाला हरावं लागणार आहे, याला खेळ म्हणतात. जेव्हा तुम्ही काही सामने आरामात जिंकता आणि ते सामने देखील जिंकता ज्यात जिंकण्याची आशा देखील नसते, तेव्हा तुमचा स्वतःवरील आत्मविश्वास वाढतो. जेव्हा तुम्ही असे सामने जिंकता तेव्हा ड्रेसिंग रूममधील वातावरण बदलते, असं एडन मार्करमने म्हटलं आहे. 


टीम इंडिया नक्कीच एक चांगला संघ आहे. मात्र, साऊथ अफ्रिका संघाने मागील काही वर्षापासून योग्य दिशेने पाऊलं उचलली आहेत. आता आमच्यासाठी ही मोठी संधी आहे. निकाल काहीही लागला तरी संघाला जिंकण्याची भूक आहे आणि ती दिसून देखील येत आहे. आम्ही ट्रॉफीसाठी मनापासून खेळू आणि मला विश्वास आहे की आम्ही कोणत्याही परिस्थिती जिंकण्याचा प्रयत्न करू. एक टीम म्हणून आम्ही आत्तापर्यंत चांगली कामगिरी करत आहे आणि प्रत्येक खेळाडूला आपली जबाबदारी माहिती आहे, असंही एडन मार्करमने म्हटलं आहे.


टी-20 वर्ल्ड कपसाठी दक्षिण आफ्रिका : एडन मार्करम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, ब्योर्न फॉर्च्युइन आणि रायन रिकेल्टन.