दिल्ली : सध्या वीरेंद्र सेहवाग फिल्डवर नसला तरीही कॉमेंट्री बॉक्स आणि ट्विटरच्या माध्यमातून तो चाहत्यांशी सतत  संपर्कामध्ये असतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेकदा वीरू त्याच्या हटके अंदाजात ट्विटरवर अ‍ॅक्टीव्ह असतो. पण दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मात्र त्याने खंत बोलून दाखवली आहे. 


हायवेवरून प्रवास करताना शेतातली आग हवेत प्रदुषण आणि धूर निर्माण करत असल्याचे काही फोटो त्याने ट्विटरवर शेअर केले आहेत. पंजाब, हरियाणामध्ये असं दृश्य अगदी सहज दिसते. पण यामुळे वाढणारं प्रदुषण पाहता यावर वेळीच काही उपाय योजना करणं गरजेचे आहे. असे मत वीरेंद्र सेहवागने व्यक्त केले आहे. 



 


दिल्ली परिसरामध्ये धूरामुळे परिस्थिती खूपच बिकट आहे. या मागे शेतात अशाप्रकारे लावल्या जाणार्‍या आगी हे एक प्रमुख कारण आहे. 


सध्या दिल्ली परिसरात दिवाळीत फटाके विकण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे यंदा दिल्लीमध्ये प्रदुषणाकही पातळी आटोक्यात राहण्याची शक्यता आहे.