मुंबई : भारतीय कसोटी टीमचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. दुसरा तिसरा कोण नाही तर अजिंक्यच्या कार कलेक्शनमध्ये वाढ झालीये. आता त्याच्या कलेक्शनमध्ये आणखी एका कारची भर पडलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या बायो बबलमधून बाहेर पडताच अजिंक्य रहाणेच्या घरी पोहोचली. रहाणे आयपीएलच्या या सिझनमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत होता. रहाणेच्या टीमला प्लेऑफ गाठता आलं नाही. या सिझनमध्ये रहाणेची कामगिरीही विशेष नव्हती. यानंतर दुखापतीमुळे अजिंक्य रहाणेला टीमबाहेर काढण्यात आलं.


रहाणेने बीएमडब्ल्यू कार सिरीज 6 मॉडेल खरेदी केलंय. त्याने 630i M Sport व्हेरियंट विकत घेतलंय. रहाणेची ही स्पोर्ट कार पांढऱ्या रंगाची असून तिची एक्स-शोरूम किंमत सुमारे 70 लाख रुपये आहे. गेल्या वर्षी हे मॉडेल लाँच झालं होतं.



रहाणेकडे अनेक महागड्या कारचं कलेक्शन आहे. त्याच्याकडे ऑडी Q5 आहे ज्यामध्ये तो अनेकदा स्पॉट झालाय. अनेक भारतीय खेळाडूंकडे बीएमडब्ल्यूची सिरीज 6 कार आहे. गेल्या वर्षीच पृथ्वी शॉने BMW 630i M स्पोर्ट कार देखील खरेदी केली होती.


आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये रहाणेला कोलकाता नाईट रायडर्सने 1 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. यापूर्वी आयपीएल 2021 मध्ये तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत होता. IPL 2022 मध्ये रहाणेने 7 सामने खेळले. यादरम्यान त्याने 19.00 च्या सरासरीने आणि 103.90 च्या स्ट्राईक रेटने 133 रन्स केले.