मुंबई : टीम इंडियानंतर आता आयपीएलमध्येही अजिंक्य रहाणेची कामगिरी खराब राहिली आहे. कोलकात्यासाठी ओपनर म्हणून उतरणारा रहाणे आयपीएलमध्येही फेल झाला आहे. यानंतर केकेआरच्या टीममधून पण अजिंक्यला ड्रॉप करण्यात आलं आहे. हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला नव्हता. त्यामुळे आता अजिंक्यला टीम इंडियानंतर अजिंक्य रहाणेला आयपीएलमधून पण डच्चू मिळण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्येही रहाणेचा खराब फॉर्म कायम आहे. गेल्या पाच सामन्यांत त्याला आतापर्यंत केवळ 80 रन्स करता आले आहेत. त्यापैकी 44 धावा त्याने पहिल्याच सामन्यात केले होते.


अजिंक्य रहाणे आधीच टीम इंडियाच्या बाहेर आहे. निवड समितीने त्याला श्रीलंकेविरुद्धच्या सिरीजमध्ये संधी दिली नाही. भारताच्या टीमचं उपकर्णधारपदही त्याच्याकडून काढून घेण्यात आलं. आयपीएल 2022 मध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर रहाणे टीम इंडियात परतेल, असं सर्वजण गृहीत धरत होते. मात्र आयपीएल 2022 मध्ये त्याचा खराब फॉर्म पाहता टीम इंडियात त्याचं कमबॅक होण्याची शक्यता कमीच आहे.


2021 मध्येही अजिंक्य रहाणे फेल


अजिंक्य रहाणे आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात होता. तेव्हा त्याला केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली होती. यामध्येही त्याने केवळ 8 रन्स केले होते. तर 2020 च्या सिझनमध्ये 9 सामन्यात त्याने 14.12 च्या सरासरीने एकूण 113 रन्स केले होते.