मुंबई : बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियाच्या बाहेर असलेल्या मराठमोठ्या अजिंक्य रहाणेला टीम इंडियामध्ये संधी मिळत नाहीये. असं असूनही रहाणेची देशांतर्गत क्रिकेटमधील उंची कमी झालेली नाही. नुकतंच त्याने त्याच्या नेतृत्वाखाली दुलीप ट्रॉफी 2022 हंगामात 12 वर्षांनंतर पश्चिम विभागीय चॅम्पियन्सचं नेतृत्व केलं. तर आता पुन्हा एकदा रहाणेच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रहाणेकडे मुंबई टीमचे कर्णधारपद सोपवण्यात आलंय.


Ajinkya Rahane ला मिळालं मुंबईचं कर्णधारपद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 11 ऑक्टोबरपासून सुरू होत असून मुंबईचा पहिला सामना मिझोरामविरुद्ध होणार आहे. मुंबई त्यांचे सर्व सामने राजकोटमध्ये खेळणार असून अजिंक्य रहाणे यशस्वी जैस्वाल, पृथ्वी शॉ आणि सरफराज खानसारख्या खेळाडूंनी भरलेल्या टीमचं नेतृत्व करेल. 


सलील अंकोला यांच्या नेतृत्वाखालील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वरिष्ठ निवड समितीने अष्टपैलू शिवम दुबेची मुंबई संघात निवड केलीये. गोलंदाजीमध्ये शार्दुल ठाकूर, शम्स मुलाणी, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी आणि तुषार देशपांडे यांचाही समावेश करण्यात आला आहे.


सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी T20 साठी मुंबईची टीम


अजिंक्य रहाणे (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, पृथ्वी शॉ, सरफराज खान, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, हार्दिक तामोर, प्रशांत सोळंकी, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, शिवम दुबे, अमन खान, साईराज पाटील, मोहिते पाटील.