Ajinkya Rahane: मराठमोळा अजिंक्य एकटा कांगारूंना भिडला; शतक हुकलं पण रचला इतिहास!
Ajinkya Rahane, IND vs AUS: किंग कोहली बाद झाल्यावर 71 वर 4 विकेट अशी भारताची परिस्थिती होती. त्यावेळी रहाणेने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि टीम इंडियाचा स्कोरबोर्ड खेचून नेला.
Ajinkya Rahane WTC Final 2023: सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया (Aus vs Ind) सामन्यात कांगारूंच्या घाकत गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्याचं दिसून आलंय. ना विराट चालला ना रोहित. तर पुजाराचा अनुभव देखील फ्लॉप गेला. आयपीएलमध्ये ज्याला डोक्यावर चढवलं तो शुभमन गिल, बॉल सोडताना आऊट झाला. तब्बल 18 महिन्यांच्या दीर्घ काळानंतर संघात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या मराठमोळ्या खेळाडूने झुंजार खेळी केली आणि ओव्हलच्या (Kennington Oval) मैदानावर कांगारूंना घाम फोडला.
किंग कोहली बाद झाल्यावर 71 वर 4 विकेट अशी भारताची परिस्थिती होती. त्यावेळी रहाणेने आपल्या खांद्यावर जबाबदारी घेतली आणि टीम इंडियाचा स्कोरबोर्ड खेचून नेला. त्यावेळी त्याला रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) मोलाची साथ दिली. 48 धावा करत जडेजा तंबुत परतला. मात्र, रहाणेने एक बाजू लावून धरली. रहाणे शतक पूर्ण करणार, असं सर्वांना वाटत होतं. मात्र, कॅप्टन पॅट कमिन्सने सुत्र हातात घेतली आणि रहाणेला 89 धावांवर बाद केलं. 11 धावांनी रहाणेचं शतक हुकलं. मात्र, त्याने टीम इंडियाचा आशा कायम ठेवल्या आहेत.
शतक (Ajinkya Rahane Century) जरी हुकलं असलं तरी रहाणेने या सामन्यात इतिहास रचला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल (WTC Final 2023) सामन्यात अर्धशतक ठोकणारा तो पहिला फलंदाज ठरलाय. शतक झालं असतं तर शतक ठोकणारा तो पहिला खेळाडू ठरला असता. मात्र, कॅमरून ग्रीनने (Cameron Green) स्लिपला अफलातून कॅच घेतला आणि रहाणेच्या खेळीचा दी एन्ड केला. रहाणेच्या विकेटनंतर काँगारूंच्या जीवात जीव आल्याचं दिसून आलंय.
आणखी वाचा - रविंद्र जडेजाने केला टीमचा आणि देशाचा विश्वासघात? हरभजन सिंगने केलं धक्कादायक विधान!
दरम्यान, इंग्लंडमध्ये भारतासाठी सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांचं नाव जोडलं गेलं आहे. या दोघांनी 109 धावांची पार्टनरशीप केली. 22 व्या ओव्हरमध्ये कॅट कमिन्सच्या एका नो बॉलमुळे रहाणेला अभय मिळालं होतं. पॅट कमिन्स याने स्टंप्सच्या लाईनमध्ये गुड लेंथ टाकला आणि रहाणे एलबीडब्ल्यू बाद झाला. त्यावेळी थर्ड अंपायरने नो बॉल दिला आणि रहाणेला जीवदान मिळालं.