Ajinkya rahane : आयपीएलमध्ये `ज्या` खेळाडूच्या टीमला धुतलं त्यानेच दिली रहाणेला टीम इंडियामध्ये एन्ट्री
गेल्या 15 महिन्यांपासून अर्जुन टीम इंडियाच्या बाहेर होता. मात्र रणजी ट्रॉफी आणि आयपीएलमधील त्याचा फॉर्म पाहता त्याला पुन्हा एकदा संधी देण्याचा विचार केला गेलाय. दरम्यान रहाणेच्या कमबॅक मागे दुसरं तिसरं कोणी नाही तर रोहित शर्मा जबाबदार असल्याचं समोर आलंय.
Ajinkya rahane : टेस्ट टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya rahane) सध्या खूश आहे. याचं कारण म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) फायनल सामन्यासाठी टीम इंडियाच्या (Team India) स्क्वॉडमध्ये अजिंक्य रहाणेच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. गेल्या 15 महिन्यांपासून अर्जुन टीम इंडियाच्या बाहेर होता. मात्र रणजी ट्रॉफी आणि आयपीएलमधील त्याचा फॉर्म पाहता त्याला पुन्हा एकदा संधी देण्याचा विचार केला गेलाय. दरम्यान रहाणेच्या कमबॅक मागे दुसरं तिसरं कोणी नाही तर रोहित शर्मा जबाबदार असल्याचं समोर आलंय.
अजिंक्य रहाणे सध्या उत्तम फॉर्ममध्ये
रणजी ट्रॉफी असो, दुलिप ट्रॉफी असो किंवा आयपीएल या सर्व स्पर्धांमध्ये अजिंक्य रहाणेने उत्तम कामगिरी केली आहे. सध्या आयपीएल सुरु असून आयपीएलच्या सामन्यांमध्येही अजिंक्य रहाणेच्या नावाची चांगलीच चर्चा आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या शेवटच्या सामन्यात अजिंक्यने 29 बॉल्समध्ये 71 रन्सची खेळी केली होती. याशिवाय रणजी ट्रॉफीमध्येही त्याने द्विशतक केलं होतं.
रहाणेचा हा उत्तम फॉर्म पाहता टीम इंडियाचे प्रमुख कोच राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी अजिंक्यला टीममध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. द टेलीग्राफमध्ये दिलेल्या बातमीनुसार, अजिंक्य रहाणेचा टीम इंडियामध्ये समावेश व्हावा म्हणून राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांनी पुढाकार घेतला होता.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर गेलाय. त्यामुळे त्याच्या जागी टीम इंडियामध्ये कोणाला संधी द्यायची हा प्रश्न अनुत्तरित होता. अशावेळी सध्या फॉर्ममध्ये असलेला अजिंक्य रहाणेच्या नावाचा विचार करण्यात आला. बीसीसीआयने मंगळवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठीच्या फायनल टीमची घोषणा केली. यामध्ये अजिंक्यच्या नावाचा उल्लेख होता.
कशी असेल WTC साठी टीम इंडिया
रोहित शर्मा
शुभमन गिल
विराट कोहली
अजिंक्य रहाणे
चेतेश्वर पुजारा
केएस भरत
रविचंद्रन अश्विन
रविंद्र जडेजा
केएल राहुल
अक्षर पटेल
शार्दुल ठाकूर
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज
उमेश यादव
जयदेव उनाडकट
कधी रंगणार फायनल सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया आयपीएल संपल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच रंगणार आहे. या दोन्ही टीम्समध्ये 7 जून 2023 रोजी हा सामना खेळवला जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल टीम इंडियाने दुसऱ्यांदा गाठली आहे. यंदाच्या वेळी टीम इंडिया बाजी मारणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.