तिसऱ्या टेस्टमधून अजिंक्य रहाणेला बाहेर काढा...!
तिसऱ्या टेस्टसाठी प्लेईंग 11 कसं असणारं याकडे लक्ष आहे.
केपटाऊन : दुसऱ्या टेस्टमध्ये पराभव स्विकारल्यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये भारतला जिंकणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तिसऱ्या टेस्टसाठी प्लेईंग 11 कसं असणारं याकडे लक्ष आहे. तिसरी कसोटी निर्णायक असल्यामुळे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराला टीममध्ये स्थान मिळणार का हा प्रश्न आहे. दरम्यान यावर टीमचा माजी फलंदाज गौतम गंभीरने यावर त्याचं मत व्यक्त केलं आहे.
स्टार स्पोट्सला दिलेल्या कमेंट्रीमध्ये गौतम गंभीर म्हणाला, "हनुमा विहारीने दोन्ही डावांमध्ये चांगला खेळ केला आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणेने भलेगी अर्धशतक झळकावलं असेल तरीही त्याला पुरेशा संधी मिळाल्या आहेत."
गंभीर पुढे म्हणाला, "विहारी केवळ एकाच फॉरमॅटमध्ये खेळतो. त्याने ऑस्ट्रेलियाविरूद्धही चांगली कामगिरी केली होती. तुम्हाला भविष्याचाही विचार केला पाहिजे."
पुजाराला संधी मिळाली पाहिजे
नंबर 3ची जागा स्पेशलिस्टची जागा आहे. त्यामुळे माझ्या मते त्या ठिकाणी चेतेश्वर पुजाराला संधी द्यायला पाहिजे, असंही गौतम गंभीरने सांगितलं आहे. पुजाराने गेल्या दोन वर्षांपासून एकंही शतक झळकावलेलं नाही. तर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये 53 रन्स केले होते.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तिसरी आणि शेवटची टेस्ट 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये होणार आहे. यानंतर दोन्ही देशांमध्ये 3 वनडे सामन्यांची सीरीज होणार आहे.