Ajinkya Rahane : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) साठी बीसीसीआयने मंगळवारी टीम इंडियाची (Team India) घोषणा केली. निवड झालेल्या खेळाडूंच्या लिस्टमधील एका नावाने मात्र सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. हे नाव होतं, ते म्हणजे अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane). तब्ल 15 महिन्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये खेळताना दिसणार आहे. रहाणे पुन्हा भारतासाठी खेळणार असल्याने त्याचे चाहते फारच खूश आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रहाणेची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) सामन्यासाठी निवड झाल्याने चाहत्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. यावेळी रहाणेच्या (Ajinkya Rahane) चाहत्यांनी त्याला भरपूर पाठिंबा दिला आहे. यावेळी फॅन्सने त्याच्यावर काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, ते पाहूयात.








15 महिन्यानंतर रहाणेचं कमबॅक


अजिंक्य रहाणेचा खेळ अगदी उत्तम आहे. मात्र गेल्या वर्षी त्याचा फॉर्म खराब होता. अजिंक्य रहाणे टेस्ट टीम इंडियाच्या फलंदाजीचा कणा मानला जात होता. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये खराब फॉर्ममुळे त्याला वगळण्यात आलं. मात्र तरीही रहाणेने प्रयत्न सोडले नाही. टीम इंडियामधून ड्रॉप झाल्यानंतर तो रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळला. रणजी ट्रॉफीमध्ये अजिंक्यने मोठी खेळी कर द्विशतक झळकावलं होतं. 


सध्या आयपीएल सुरु असून रहाणे चेन्नईकडून खेळतोय. आयपीएलमध्येही अजिंक्यने त्याच्या नावाचं नाणं अगदी खणखणीत बजावलं. कोलकाताविरूद्धच्या सामन्यात त्याने 29 बॉल्समध्ये 71 रन्सची खेळी करत पुन्हा बीसीसीआयला त्याचा उत्तम खेळ दाखवून दिला. आणि अखेर मंगळवारी सकाळी बीसीसीआयने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आणि यामध्ये अजिंक्यच्या नावाचा समावेश करण्यात आला. 


अजिंक्यकडून हिसकावलं उपकर्णधारपदं


2021 मध्ये झालेल्या बॉर्डर गावस्कर अजिंक्य रहाणेने कर्णधारपदाची भूमिका मोलाची होती. रहाणेने जानेवारी 2022 मध्ये शेवटचा टीम इंडियासाठी सामना खेळला होता. मात्र रहाणे त्यावेळी खराब फॉर्मशी झुंज देत होता. त्यावेळी निराशाजनक खेळीमुळे त्याच्याकडून टीमचं उपकर्णधार पदंही काढून घेण्यात आलं. मात्र आता लवकरच तो टीम इंडियामध्ये कमबॅक करणार आहे.