Ajinkya Rahane : रोहितला मिळणार डच्चू? कर्णधारपदाची माळ अजिंक्य रहाणेच्या गळ्यात पडण्याची शक्यता
Ajinkya Rahane : रोहित शर्मानंतर टेस्ट टीमचा कर्णधार कोण होणार हा सवाल चाहत्यांच्या मनात उपस्थित होतोय. तर यामध्ये मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेचं ( Ajinkya Rahane ) नाव अग्रस्थानी असल्याचं म्हटलं जातंय.
Ajinkya Rahane : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर टीम इंडियाला ( Team India ) ऑस्ट्रेलियाच्या टीमकडून पराभव स्विकारावा लागला. या सामन्यामध्येही टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) खराब परफॉर्मन्स दिसून आला. यानंतर रोहितच्या कर्णधारपदावरून देखील प्रश्न उपस्थित लागलेत. अशातच आता रोहित शर्मानंतर टेस्ट टीमचा कर्णधार कोण होणार हा सवाल चाहत्यांच्या मनात उपस्थित होतोय. तर यामध्ये मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेचं ( Ajinkya Rahane ) नाव अग्रस्थानी असल्याचं म्हटलं जातंय.
बीसीसीआयचा हिटमॅनवर विश्वास
मुख्य म्हणजे भारतीय क्रिकेट बोर्डाचा हिटमॅनवर विश्वास आहे. पुढच्या महिन्यात टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी रवाना होणारे. दरम्यान या सिरीजमधमध्ये रोहित शर्माचं ( Rohit Sharma ) टेस्ट टीमचं नेतृत्व करणार असल्याची माहिती आहे. या सिरीजमध्ये जर पुन्हा रोहित शर्मा ( Rohit Sharma ) फेल झाला तर त्याच्यावर कर्णधार पद गमावण्याचा दबाव असणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाला दोन टेस्ट, 3 वनडे आणि चार टी-20 सामने खेळायचे आहेत.
बीसीसीआय अधिकाऱ्याने नाव न देण्याच्या अटीवर माहिती दिली की, "रोहितला ( Rohit Sharma ) कर्णधारपदावरून हटवण्यात येणार असल्याच्या या निराधार चर्चा आहेत. पण अजून दोन वर्षांचा WTC तो असेल का यावर मोठा प्रश्न आहे. 2025 मध्ये तो 38 वर्षांचा होईल. टेस्ट सामन्यांनंतर आणि त्यांचा फलंदाजीचा फॉर्म पाहता याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे."
कोणाच्या गळ्यात पडणार कर्णधारपदाची माळ?
दरम्यान नवा कर्णधाराबद्दल बोलायचं झालं तर विराट कोहली हा पर्याय नाही. अशावेळी अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) नावाचा विचार बीसीसीआय करू शकते. दरम्यान निवड समितीत अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane )आणि शुभमन गिल यांच्या कर्णधारपदाच्या नावाबाबत निवड समिती सकारात्मक असल्याचं म्हटलं जातंय. मात्र शुभमन गिलच्या तुलनेत अजिंक्य रहाणेला ( Ajinkya Rahane ) अनुभव जास्त असल्याने त्याला ही संधी मिळू शकते.
अजिंक्य रहाणेने टीम इंडियाचं कर्णधारपद यापूर्वी भूषवलं आहे. 2020-21 मध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या वेळी कठीण परिस्थितीत 3 सामन्यांसाठी अजिंक्यने ( Ajinkya Rahane ) कर्णधारपद स्विकारलं होतं. इतकंच नव्हे तर ही सिरीज देखील टीम इंडियाने जिंकली आणि नवा इतिहास रचला. याशिवाय कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेचा ( Ajinkya Rahane ) रेकॉर्ड देखील उत्तम आहे.
18 महिन्यांनंतर केलं कमबॅक
नुकतंच इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane ) तब्बल 18 महिन्यांनी कमबॅक केलं. यावेळी टीम इंडियाच्या फलंदाजांमध्ये केवळ अजिंक्यनेच उत्तम कामगिरी केली. ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या डावात अजिंक्यने 89 रन्सची खेळी करत टीमवरचा फॉलोऑन टाळला. एकंदरीत त्याचा फॉर्म पाहता कर्णधारपद पुन्हा रहाणेकडे जाण्याची दाट शक्यता आहे.