Ajinkya Rahane Good news : गेल्या कित्येक दिवसांपासून संघाच्या बाहेर असलेला मराठमोळा अजिंक्य रहाणेला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मुंबईच्या नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. रहाणेसाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. रहाणे दुसऱ्यांदा बापमाणूस झाला आहे. रहाणेने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांनाही सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमच्या बाळाचं मी आणि राधिकाने मिळून आनंदाने  स्वागत केलं आहे. राधिका आणि नुकतंच जन्मलेलं आमचं बाळ दोघेही सुखरूप आहेत.तुमच्या प्रेमासाठी आणि आशिर्वादासाठी खूप आभारी आहोत, असं अजिंक्य रहाणेने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अजिंक्य रहाणेला मुलगा झाला आहे.


 



अजिंक्य रहाणेने सप्टेंबर 2014 मध्ये बालमैत्रिण राधिका धोपावकरसोबत लग्न केलं होतं. अजिंक्य आणि राधिका हे बालपणीचे मित्र आहेत. या मुलाच्या आधी राधिकाने 2019 मध्ये एका मुलीला जन्म दिला होता, तिचं नाव आर्या ठेवलं आहे. 


बऱ्याच दिवसांपासून रहाणे टीम इंडियाच्या बाहेर आहे. 11 ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये रहाणेकडे मुंबई संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.