मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला टेस्ट सामना 17 डिसेंबरपासून रंगणार आहे. पहिल्या सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भारतात परतणार आहे. त्यामुळे संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. त्याने दोन कसोटी सामने जिंकले आहेत. दुसरीकडे, विराट कोहलीने बुधवारी म्हटले आहे की, 'अजिंक्य रहाणे त्यांच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करेल आणि त्यासाठी स्टेज सज्ज आहे, तसेच याबद्दल सर्वांना ठाऊक आहे.'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारीपासून एडिलेड ओव्हल मैदानावर डे-नाईट टेस्ट खेळल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी मायदेशी परतणार आहे. यानंतर उपकर्णधार अजिंक्य रहाणे मालिकेच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यात संघाचा कर्णधार असेल. रहाणेने दोन सराव सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले. यामध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांनी ज्या पद्धतीने गोलंदाजांना चालवले ते कौतुकास्पद होते.



डे-नाईट कसोटी सामन्याआधी कोहली म्हणाला की, "बरीच वर्षे आमचा परस्परांबद्दल समजूतदारपणा आणि एकमेकांबद्दल आदर आहे. आम्ही चांगली भागीदारी केली आहे, एकत्र फलंदाजी केली आहे. रहाणेने दोन सराव सामन्यांत शानदार कामगिरी केली आहे. तो शांत राहतो आणि संघाची शक्ती त्याला माहित आहे. आम्ही ज्या प्रकारचे क्रिकेट खेळलो आहे, तो संपूर्ण संघाचा संयुक्त प्रयत्न आहे. आम्हाला माहित आहे. आम्हाला कसे खेळायचे आणि गोष्टी कशा घ्यायच्या."


यापूर्वी अजिंक्य रहाणेने कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. रहाणे ऑस्ट्रेलियाविरुद्ध धर्मशाळेत आणि अफगाणिस्तानविरूद्ध बंगळुरु येथे कर्णधार म्हणून मैदानात होता आणि दोन्ही सामन्यात टीम इंडियाने विजय मिळविला. कोहली म्हणाला की, तो आणि रहाणे एकाच पानावर आहेत. रहाणे त्याच्या अनुपस्थितीत चांगला कर्णधार असेल. मी जोपर्यंत तिथे आहे तोपर्यंत मी सर्वोत्तम कर्णधार होण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम फलंदाजी करीन. त्यानंतर रहाणे उत्तम कामगिरी करेल असा मला विश्वास आहे.'