Ajit Agarkar : अजित आगरकर यांना `बॉम्बे डक` हे टोपण नाव का पडलं होतं?
Ajit Agarkar : मुंबईचा खेळाडू आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज अजित आगरकर ( Ajit Agarkar ) याची निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागलीये. टीम इंडियाकडून खेळत असताना अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांना बॉम्बे डक म्हणून संबोधलं जायचं. त्यांना या नावाची ओळख का मिळाली, हे आज आपण जाणून घेऊया.
Ajit Agarkar : अखेर टीम इंडियाच्या ( Team India ) निवड समितीच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झालंय. मुंबईचा खेळाडू आणि टीम इंडियाचा माजी गोलंदाज अजित आगरकर ( Ajit Agarkar ) याची निवड समितीच्या अध्यक्षपदी वर्णी लागलीये. 10 वर्षांपूर्वी आगरकरने तिन्ही फॉर्मेटवरून संन्यास घेतला होता. आगरकर यांच्यापूर्वी चेतन शर्मा यांनी ही जागा सांभाळली होती. अखेर त्यांच्या राजीनाम्यानंतर अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय.
टीम इंडियाकडून खेळत असताना अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांना बॉम्बे डक म्हणून संबोधलं जायचं. त्यांना या नावाची ओळख का मिळाली, हे आज आपण जाणून घेऊया.
आगरकर यांच्या नावे अनेक रेकॉर्ड्स
टीम इंडियाकडून खेळत असताना अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांच्या नावे अनेक रेकॉर्ड्सची नोंद आहे. भारताकडून अजितने 26 टेस्ट, 191 वनडे आणि 4 टी-20 सामने खेळले आहेत. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडला क्रिकेटची पंढरी मानलं जातं. ऑगस्ट 2002 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर असताना लॉर्ड्सच्या मैदानावर एक सामना खेळवण्यात आला होता. यावेळी आगरकर यांनी तुफान शतक ठोकत मोठा रेकॉर्ड आपल्या नावे करून घेतला. त्यावेळी आगरकर यांनी 190 बॉल्समध्ये 109 रन्सची खेळी केली होती.
बॉम्बे डक का म्हटलं जातं?
1998 मध्ये अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केलं होतं. यावेळी सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली अजित आगरकरच्या ( Ajit Agarkar ) नावे एक नकोसा रेकॉर्ड जडला होता. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना 5 टेस्ट सामन्यांच्या 5 डावांमध्येही आगरकर शून्यावर बाद झाले होते. यावेळी सलग 7 वेळा शून्यावर आऊट झाल्यानंतर त्यांना बॉम्बे डक असं टोपण नाव देण्यात आलं.
निवड समितीच्या अध्यक्षपदी अजित आगरकर
गेल्या काही दिवसांपासून सिलेक्शन कमिटीच्या चीफ पदासाठी अजित आगरकरचं नावं आघाडीवर होतं. अजित आगरकर ( Ajit Agarkar ) यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या कोचिंग स्टाफ पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंगळवारी अशोक मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) मुलाखतीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती दर्शवली होती. त्यानंतर आगरकर यांना मुख्य निवडकर्ता म्हणून घोषित करण्यात आलं होतं. यापूर्वी चेतन शर्मा ( Chetan sharma ) हे मुख्य निवडकर्ता म्हणून काम पाहत होते.