Ind Vs Pak Asia Cup 2022 :  आशिया कपमधील भारत आणि पाकच्या सामन्यामुळे आजचा संडे सुपर डुपर ठरणार आहे. सामन्याला काही तासांचा अवधी बाकी राहिला आहे. त्याआधी भारताच्या माजी खेळाडूने सामन्याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने टॉसवरून सामन्याचा निकाल सांगितला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने टॉस हरला तरी भारताचा विजय पक्का आहे. दुबईची खेळपट्टी पाहिली तर त्यावर खूप गवत आहे आणि वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवर मदत होते. मात्र पाकिस्तानचा हुकमी गोलंदाज शाहिन आफ्रिदी हा दुखापतीमुळे बाहेर आहे. याचा मोठा फटका त्यांना बसणार असल्याचा चोप्रा म्हणाला.


दुबईमध्ये टॉस जिंका आणि मॅच जिंका असा एक फॉर्मुला झाला आहे. कोरोनावेळी आयपीएल दुबईमध्ये भरवण्यात आली होती. त्यावेळी जो संघ टॉस जिंकत होता तो संघ मॅच जिंकत होता. आजचाही सामना दुबईमध्ये होत आहे. मात्र आकाश चोप्राच्या भविष्यवाणीनुसार भारताने टॉस हरला तरी भारत पाकिस्तानला हरवणार असल्याचं आकाश चोप्राने म्हटलं आहे.  


भारतीय टीम: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह और आवेश खान.


पाकिस्तान टीम: बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हारिस रउफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, हसन अली, नसीम शाह, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर और मोहम्मद हसनैन.