मुंबई : आयपीएल 2021 सुरू होताच खेळाडूंची मजादेखील सुरू झाली आहे. आयपीएल फ्रँचायझी त्यांच्या चाहत्यांशी संपर्क साधण्यासाठी अनेक मार्ग अवलंबत आहेत. राजस्थान रॉयल्सने एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. यात आकाश सिंह आणि चेतन सकरिया हे दोन युवा गोलंदाज मजेदार चॅट करत आहेत. यामध्ये ते दोघेही त्यांच्या आवडी- नावडीआणि स्वप्नांविषयी बोलत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हीडिओमध्ये आकाश सिंग म्हणाला की, मला अंबानी व्हायचे आहे. त्याचवेळी चेतन साकारिया म्हणाला की, मला अनन्या पांडेला डेटवर घेऊन जायला आवडेल. आकाश आणि चेतन हे दोघे Left Hand गोलंदाज आहेत. आकाश मुळचा राजस्थानचा आहे. तो 2020 मध्ये अंडर 19 वर्ल्डकच्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या भारतीय संघाचा तो भाग होता. चेतन हा गुजरातचा राहणारा आहे आणि तो सौराष्ट्रसाठी क्रिकेट खेळतो. त्याने पंजाब किंग्स विरुद्ध आयपीएलमध्ये डेब्यू केले होते.


आकाश सिंगशी बोलताना चेतन म्हणाला की, युवराज सिंग त्यांचा आदर्श आहेत. चेतनने सांगितले की, त्याने प्रथम फलंदाज म्हणूनच क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. तो ' तारे जमीं पर' हा सिनेमा पाहूण खूप भावूक झाला, कारण त्याला तो सिनेमा त्याच्या आयुष्याशी मिळता जुळता वाटतो.


तर चेतनने आपल्याला अनन्या पांडेला डेटवर नेण्यास आवडेल असे सांगितले. "ती खूप सुंदर आहे आणि मला अनन्याबरोबर बीच डेटवर जायला आवडेल. तेथे मी तिच्याबरोबर कॅफी पिणार आहे."


चेतन साकारियाला त्याच्या पालकांची सर्व स्वप्ने पूर्ण करायची इच्छा आहे असे त्याने सांगितले. आकाश आणि चेतन यांच्यात एकमेकांच्या चेंडूवर सर्वाधिक धावा करण्याचा प्रश्न उपस्थित केला होता, त्यावेळी दोघेही म्हणाले की, मी जिंकेल आणि जास्त छक्के मारेन. यादरम्यान दोघांनी असे ठरवले की, ते आपापसांत एक-एक ओव्हरचा सामना खेळतील.



आकाश सिंगला अंबानींचे आयुष्य जगायचे आहे


त्या व्हीडिओमध्ये आकाश सिंगने स्वत: बद्दल सांगितले की, त्याला कुत्र्यांची भीती वाटते. बालपणाशी निगडित एक किस्सा त्यांने सांगितला, एकदा गावात त्याच्या मागे कुत्रा लागला होता. खूप मुश्किलीने त्याने आपला जीव वाचवला होता. म्हणून त्याला कुत्र्यांची भिती वाटते. जेव्हा त्यांला विचारले की, त्याला कोणत्या व्यक्तीचे आयुष्य जगण्याची इच्छा आहे? यावर आकाशने अंबानीचे नाव घेतले आणि तो म्हणाला की, "मला पाहायचे आहे की, ते किती मज्जा करतात ते."


चेतनही त्याच्या या उत्तरावर खूश झाला. त्याने आकाशच्या या उत्तराचे कौतुक केले आणि पुढे आकाशला विचारले की, जर एक दिवसासाठी तो अंबानी झाल्यास तो काय करेल? आकाशने हा प्रश्न हसून टाळला. तो म्हणाले की, "हे मला सांगता येत नाही." आकाशने पुढे खुलासा केला की, स्पेशल ऑप्स ही त्याची आवडती वेब सीरीज आहे. तसेच, अक्षय कुमारच्या हॉलिडे चित्रपट हा माझा आवडता चित्रपट आहे.