मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका तिसऱ्या आणि शेवटच्या टेस्टसाठी टीम इंडियामध्ये स्पिनर अक्षर पटेलचा समावेश झाला आहे. १२ ऑगस्टला होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठई रविंद्र जडेजावर बॅन लावल्यामुळे भारतीय टीममध्ये १५ वा सदस्य म्हणून अक्षरचा समावेश झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टेस्टमध्ये कुलदीप यादव देखील प्लेइंग इलेवनमध्ये खेळणार आहे. रविंद्र सारखाच बॉलर टीम इंडियाला हवा होता म्हणून अक्षरची निवड करण्यात आली आहे. अक्षर सधया दक्षिण आफ्रिकेत आहे. तो टीम 'ए' संघात खेळतो. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, मंगळवारी संध्याकाळी अक्षरचे वनडे मॅच पूर्ण होतील. १० तारखेला तो टीम इंडियामध्ये सहभागी होईल. 


अक्षर आणि जयंत यादव यांच्यामध्ये कोणाला घ्यायचं याबाबत शंका होती. त्यानंतर अक्षरच्या नावाची घोषणा झाली.