मुंबई : नुकत्याच इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या पहिल्या डे-नाईट टेस्ट क्रिकेट मॅचमध्ये अॅलिस्टर कूकने शानदार द्विशतक ठोकले. कूकने वेस्ट इंडिज विरूद्ध २४३ धावांची खेळी केली. यामुळे कूकने ३ वर्षांनंतर आयसीसी रँकिंगमध्ये सर्वोच्च रँकिंग मिळवली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या कूक सहा अंक मिळवून सहाव्या स्थानावर गेला आहे. यापूर्वी २०१३ मध्ये तो पाचव्या स्थानावर  होता. सन २०११ मध्ये कूक आपल्या करिअरच्या सर्वोत्कृष्ट (दुसऱ्या) स्थानावर पोहचला होता. आता तो विराट कोहलीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत आहे. आता विराट पाचव्या स्थानावर आहे. कूक विराटपेक्षा फक्त ८ अंक मागे आहे.  कूकने आगामी सामन्यात चांगली कामगिरी केली तर तो कोहलीला धोका निर्माण करू शकतो. 


रूटलाही फायदा...


कूक शिवाय या सामन्यात कर्णधार जो रूट याने शतक झळकावले.  त्याला १४ अंकाचा फायदा झाला आहे. 
तो स्टिव्ह स्मिथ पेक्षा फक्त ३६ अंक मागे आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश टेस्ट सिरीज होणार आहे, त्यामुळे पहिल्या स्थानासाठीची लढत रंगतदार होणार आहे.