मुंबई : हार्दिक पांड्या गेल्या काही महिन्यांपासून खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत होता. त्यामुळे पांड्याने ब्रेक घेतला होता. आता पुन्हा एकदा गुजरात संघाचं कर्णधारपद पांड्याकडे आहे. टी 20 वर्ल्ड कपपासून पांड्या टीम इंडिया बाहेर असणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्यासाठी आता 27 वर्षांचा व्यंकटेश अय्यर धोक्याचा ठरू शकतो. याचं कारण म्हणजे व्यंकटेश अय्यरने आपल्या कामगिरीमुळे सर्वांची मन जिंकली आहेत. टीम इंडियासाठी तो उत्तम खेळाडू असल्याचं त्याने सिद्ध केलं आहे. बॅटिंग फिल्डिंग आणि बॉलिंग तिन्हीमध्ये आपली कमाल दाखवली आहे. 


कर्णधार रोहित शर्माने व्यंकटेश अय्यरला संधी दिली आणि त्याच्या कामगिरीचं कौतुक केलं. आता व्यंकटेश अय्यर 2022 च्या टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा भाग असू शकतो. कारण हार्दिक पांड्या आपल्या खराब फॉर्मुळे सध्या चर्चेत आहे. त्याने फिटनेस टेस्ट जरी चांगल्या मार्कांनी पास केली असली तरी आता तो आयपीएलमध्ये काय कामगिरी करतो त्याकडे लक्ष असणार आहे. 


हार्दिक पांड्याने जर आयपीएल 2022 मध्ये उत्तम कामगिरी केली तर व्यंकटेश अय्यरची जागा धोक्यात येईल. पण जर पांड्या पुन्हा फेल गेला तर त्याची जागा धोक्यात येऊ शकते. पांड्याच्या जागी व्यंकटेश अय्यरला खेळवलं जाण्याची शक्यता आहे. 


अय्यरने 10 सामने खेळून 370 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 4 अर्धशतकं ठोकली आहे. तर 3 विकेट्स घेतल्या आहेत. दीपक चाहरला कोलकाता संघाने रिटेन केलं आहे. यंदा व्यंकटेश अय्यर आणि हार्दिक पांड्या यांच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.