मुंबई : आयपीएलचे सामने अत्यंत निर्णायक टप्प्यावर आले आहेत. प्लेऑफसाठी चुरशीची लढत सुरू आहे. अशातच चेन्नई टीमसाठी एक धक्कादायक बातमी आहे. स्टार खेळाडू निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे. त्याने तसा निर्णय घेऊन सोशल मीडियावर जाहीर देखील केला. मात्र 10 व्या मिनिटांत काय झालं की त्याने बाजी पलटली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चेन्नईचा स्टार खेळाडू अंबाती रायडूने सोशल मीडियावर निवृत्ती घेत असल्याची पोस्ट टाकली. या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. मात्र 10 व्या मिनिटाला रायडूने ही पोस्ट सोशल मीडियावरून हटवली आहे. यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. 


अंबाती रायडू निवृत्ती घेण्याबाबत संभ्रमात आहे का? रायडूचं काही टीम किंवा मॅनेजमेंटशी बिनसलं आहे का? असे अनेक प्रश्नांवर आता चर्चा होत आहे. 



अंबाती रायडूने पोस्टमध्ये काय म्हटलं?
हे आयपीएल माझ्यासाठी शेवटचं. 13 वर्षांचा प्रवास खूप सुंदर होता. यंदाचं हे आयपीएलचं शेवटचं वर्ष आहे असं आता त्याने ट्वीट केलं होतं. हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर 10 व्या मिनिटाला त्याने ट्विट डिलीट केलं. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना खूप उधाण आलं आहे.