नवी दिल्ली : ... तसं पाहिलं तर, गोलंदाजी (बॉलिंग ) हा क्रिकेटमधला एक अवघड प्रकार. अर्थात अनेक दिग्गज खेळाडूंसाठी तो डाव्या हाताचा खेळ असतो. पण, एखादा खेळाडू म्हणजे अजबच रसायन असते. असाच एक खेळाडू भलताच चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर त्याचे फोटो भलतेच व्हायरल झाले आहेत. कारण, गोलंदाजी हा या खेळाडूच्या दोन्ही हातांचा खेळ आहे. समंजलं? नाही समंजलं? तर मग वाचा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रिकेट विश्वातील आश्चर्य असे अनेकांनी या महाभागाचे वर्णन केले आहे. हा पठ्ठ्या चक्क दोन्ही हातांनी बॉलिंग करतो. दोन्ही हातांनी बॉलिंग करतना त्याचा चेंडूच्या वेगावर काहीही फरक पडत नाही हे विशेष. आंतरराष्ट्रीय कारकीर्द गाजवलेल्या डेल स्टोन आणि वासीम आक्रम यांच्याप्रमाणे वेगवान गोलंदाजी करणे, हे तर या पठ्ठ्याचे खास वैशिष्ट्य होय. यासीर जान असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. यासीर जन्माने पाकिस्तानी आहे. पण, तो इंग्लंडच्या संघाकडून खेळत असतो.  


दरम्यान, प्राप्त माहितीनुसार, पाकिस्तान सुपर लीगमध्ये या पठ्ठ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यासीर डाव्या हाताने तब्बल १४५ किमी प्रतितास या वेगाने गोलंदाजी करू शकतो. तर, उजव्या हाताने गोलंदाजी करताना काहीसा त्याचा वेग कमी येतो. डाव्या हाताने बॉलिंग करताना तो प्रतितास १३५ किमी वेगाने चेंडू टाकतो.



दरम्यान,  यासीर जानचा एक व्हिडिओ युट्यूबवर आहे. जो भलताच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत यासीर डाव्या हाताने डेल स्टोन सारखी तर, उजव्या हाताने वासीम आक्रम याच्यासारखी बॉलिंग करताना दिसतो. वासीम आक्रम आणि डेल स्टोन या दोघांना आपण हिरो मानते असेही यासीर सांगतो. दरम्यान, यासीरच्या या हटके बॉलिंगमुळे वासीम आक्रम आणि डेल स्टोनचे चाहते मात्र भलतेच खूश आहेत.