फ्लोरीडा : मारिया शारापोव्हावाला अमेरिकन ओपनमधून अर्ली एक्झिट घ्यावी लागली. चौथ्या राऊंडमध्ये अॅनास्तेशिया सेवास्टोव्हानं 5-7, 6-4, 6-2 नं पराभव केला. या पराभवसह रशियन ग्लॅमडॉल शारापोव्हाचं अमेरिकन ओपन जिंकण्याचं स्वप्नही भंगलं. 18 महिन्यानंतर शारापोव्हा ग्रँडस्लॅम टुर्नामेंटमध्ये टेनिस कोर्टवर उतरली होती. मात्र, तिला ड्रीम कमबॅक करण्यात अपयश आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकन जायंट व्हीनस व्हिल्यम्सची अमेरिकन ओपनमध्ये आगेकूच कायम आहे. व्हीनसनं आपल्या प्री-क्वार्टर फायनलची लढत 6-3, 3-6, 6-1 नं जिंकली. तिनं स्पेनच्या कार्ला सुआरेझ नव्हारोवर मात करत क्वार्टर फायनलचा आपला प्रवेश निश्चित केला. आता व्हीनस व्हील्यम्सला सेमी फायनल गाठण्यासाठी पेट्रा क्विटोव्हाचं आव्हान मोडित काढावं लागणार आहे. 


तिस-या सीडेड गार्बिन मुगुर्झाचा धुव्वा उडवत पेट्रा क्विटोव्हानं क्वार्टर फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. 7-6, 6-3 नं बाजी मारत क्विटोव्हानं आपली मॅच जिंकली. आता व्हीनस विल्यम्सच्या कडव्या आव्हानाला तिला सामोरं जावं लागणार आहे.