Ind vs Eng: इंग्लंडचा पराभव, तरीही आनंद महिंद्र यांनी केलं सॅम करनचं कौतुक
... म्हणून आनंद महिंद्रांनी केलं इंग्लंड फलंदाज सॅम करनचं कौतुक
मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड वन डे सीरिज नुकतीच पार पडली. अटीतटीच्या तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय संघानं विजय मिळवत मालिका खिशात घातली. इंग्लंड संघाचा पराभव झाला असला तरी सॅम करनचं मात्र सगळीकडे खूप कौतुक होत आहे. त्याची जिद्द आणि शेवटपर्यंत आशा न सोडता त्याने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहेच.
सॅम करनचं वेगळेपण सांगणारं एक ट्वीट सध्या व्हायरल होत आहे. या ट्वीटनंतर आनंद महिंद्रा यांनी देखील सॅम करनचं कौतुक केलं आहे. तिसऱ्या वन डे सामन्यात करन आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारताकडून 322 धावांचं लक्ष असताना इंग्लंड संघ केवळ 7 धावांसाठी मागे पडला आणि सामनाच नाही तर मालिकाही हातातून निसटली.
आपल्या संघाचा पराभव झाला असला तरीही सॅम करनने ट्वीट करून भारतीय संघाला विजय मिळाल्यानंतर अभिनंदन केलं आहे. या मालिकेतून मी बरेच काही शिकलो, असंही सॅमनं म्हटलं आहे. त्याने केलेल्या ट्वीटनंतर आनंद महिंद्रा यांनी सॅमचं कौतुक केलं आहे.
आनंद महिंद्रा ट्वीट करत म्हणाले की, "जर तुम्ही शौर्य, नम्रता आणि सभ्यतेची व्याख्या शोधत असाल तर..." सॅम करणच्या ट्वीटला उत्तर म्हणून त्यांनी हे ट्विट त्यांनी केलं आहे. इंग्लंड संघासाठी सॅमनं दाखवलेलं शौर्य, एक खेळाडू म्हणून पराभवाचा स्वीकार करून 'वनडे मालिका जिंकल्याबद्दल त्याने भारताचं केलेलं अभिनंदन.या गोष्टी खूप काही नकळत सांगून जातात.