Babar Azam: एंकरसोबत सेल्फी घेताना बाबर आझमने केलं असं की...; व्हिडीओ होतोय व्हायरल
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या उत्तम फॉर्ममध्ये दिसून येतंय. याशिवाय पाकिस्तानची टीम देखील बाबर आझमच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करतेय. शनिवारी झालेल्या सामन्यात बाबरने तुफान फलंदाजी करत शतक केलं.
Babar Azam: सध्या न्यूझीलंड (New zealand) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्या टी-20 सिरीज सुरु आहे. यासाठी न्यूझीलंडची टीम पाकिस्तान दौऱ्यावर असून त्यांना 5 सामन्यांची टी-20 सिरीज खेळायची आहे. यामधील 2 सामने झाले असून पाकिस्तानने या सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. अशातच पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा (Babar Azam) एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. दरम्यान हा व्हिडीओ पाहिल्यानंतर बाबरचे चाहते चांगलेच खूश झालेत.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सध्या उत्तम फॉर्ममध्ये दिसून येतंय. याशिवाय पाकिस्तानची टीम देखील बाबर आझमच्या नेतृत्वाखाली चांगलं काम करतेय. शनिवारी झालेल्या सामन्यात बाबरने तुफान फलंदाजी करत शतक केलं. यावेळी त्याने 58 बॉल्समध्ये 101 रन्सची खेळी केली.
बाबरचा एंकरसोबतचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान न्यूझीलंडविरूद्ध सिरीज सुरु असताना एका महिलेसोबत सेल्फी घेताना बाबरचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. ही महिला एक एंकर आहे. या एंकरसोबत सेल्फी घेताना बाबर आझम पहिल्यांदा खूप कॉन्फिडंट दिसून येतो. मात्र सेल्फी काढून झाल्यानंतर बाबर एक विचित्र रिएक्शन देतोय. या रिएक्शनमुळे बाबरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
बाबरची शतकी खेळी
न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात बाबरने 58 बॉल्समध्ये 101 रन्सची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये बाबरने 11 फोर आणि 3 सिक्स लगावले आहेत. यावेळी बाबरचा स्ट्राईक रेट 174.14 होता. न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये पाकिस्तानी कर्णधाराने धमाकेदार फलंदाजी टीमचा स्कोर 192 रन्सवर नेण्यास मदत केली.
बाबरने केली सूर्यकुमारची बरोबरी
न्यूझीलंडविरूद्ध फलंदाजी करताना गोलंदाजांची धुलाई करत बाबरने शतक ठोकलं. यावेळी तो टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या रेकॉर्ड जवळ पोहोचला आहे. यावेळी बाबरने सूर्यकुमारच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. सूर्याने टी-20 मध्ये 3 शतकं झळकावली आहेत. तर बाबरनेही न्यूझीलंडविरूद्धच्या त्याच्या टी-20 करियरमधील तिसरं शतक झळकावलंय.
या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 4 शतकं केली आहे.