मुंबई: मैदानात असो किंवा मैदाना बाहेर खेळाडू कायम वेगवेळ्या गोष्टी करतात आणि ते किस्से चाहत्यांसोबत शेअर करत असतात. बऱ्याचदा चाहत्यांसोबत काही संघातील गुपितंही शेअर करतात जे मैदाना बाहेर घडत असतात. असंच कोलकाता संघातील आंद्रे रसेल याने वेस्टइंडिज संघातील खेळा़डूंबद्दल खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेल दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मालिका खेळत आहे. दरम्यान, रसेल देखील काही मजेदार किस्से शेअर केले आहेत. दरम्यान, रसेलने आपल्या संघातील खेळाडूंविषयीही बर्‍याच गोष्टी शेअर केल्या.


आंद्रे रसेलनेही आपल्या संघातील खेळाडूंविषयी अनेक रहस्ये उघडली. वेस्ट इंडिजने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये रसेल चाहत्यांसोबत संवाद साधताना दिसत आहे. आपल्या संघाचा कर्णधार किरोन पोलार्डबद्दल बोलताना रसेल म्हणाला की तो एक अतिशय गंभीर व्यक्ती आहे. त्याच्याबरोबर राहण्याचा आनंद मला आहे. त्याच वेळी रसेलने निकोलस पूरणबद्दल सांगितले की तो नवीन गोष्टी शिकण्यासाठी कायमच तयार असतो.


त्याच दरम्यान रसेलनं पोलार्डबद्दल एक खुलासा केला आणि सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. रसेलनं विनोदपणे सांगितले की त्याच्या संघात एक खेळाडू आहे जो विनोद करतांना रडू लागतो. तो म्हणाला की आंद्रे फ्लेचर नेहमी बोलतच राहतो. जेव्हा चेष्टा मस्करीची वेळ येते तेव्हा फ्लेचर तो रडायला लागतो. तर ख्रिस गेलबद्दल बोलताना रसेल म्हणाला की तो एक टीम मॅन आहे आणि त्याच्याकडून बरेच काही शिकण्यासारखं आहे.


आंद्रे रसेल IPL 2021मध्ये कोलकाता संघाकडून तर किरोन पोलार्ड मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबर महिन्यात होणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये पोलार्डने सर्वात लांब सिक्स ठोकण्याचा विक्रम रचला आहे.