मुंबई : ऑलराउंडर अँड्र्यू सायंमंड्सचं कार अपघातात निधन झालं. त्याच्या अचानक जाण्याने क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्याचा जन्म 1975 मध्ये इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये झाला. 1998 मध्ये त्याने वन डे सामन्यातून पहिल्यांदा डेब्यू केलं. त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2008 मध्ये अँड्र्यू सायमंड्स आणि हरभजन सिंग यांच्यात मंकीगेटवरून वाद झाला होता. सिडनी कसोटीदरम्यान हरभजनवर वांशिक वक्तव्याचा आरोप करण्यात आला होता. सायमंड्सने आरोप केला की, मैदानावर भज्जीने त्याला 'माकड' म्हटले.


अँड्र्यू सायमंड्सला दारूच्या व्यसनामुळे 2009 साली क्रिकेटपासून दूर राहावे लागलं. 2009 च्या T20 वर्ल्ड कपदरम्यान दारूशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई करण्यात आलीच. त्याला सामन्यातूनच घरी पाठवण्यात आलं होतं. 


क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही अँड्र्यू सायमंड्सबाबत वाद संपले नाहीत. 2009 मध्ये त्याने मार्नस लॅबुशेनच्या फलंदाजीवर अपमानास्पद विधान केलं. त्यावरून चॅनलला माफी मागावी लागली होती.


अँड्र्यू सायमंड्सला जगात महान क्रिकेटर म्हणून ओळखलं जात होतं. ऑस्ट्रेलियाकडून त्याने 26 कसोटी, 198 वन डे आणि 14 टी 20 सामने खेळले होते. त्याने 198 वन डे सामन्यात 1462 केले. तर कसोटीमध्ये 5088 रन केले. टी 20 सामने 337 धावा केल्या. त्याने 39 आयपीएल सामने खेळले. 2003 आणि 2007 मध्ये वर्ल्ड कप देशाला जिंकून देण्यात त्याचा वाटा होता.