अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूचे गूढ वाढले, बहिणीचा धक्कादायक सवाल
ऑस्ट्रेलियचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा याचा शनिवारी कार अपघाती मृत्यू झाला.
मुंबई : ऑस्ट्रेलियचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा याचा शनिवारी कार अपघाती मृत्यू झाला. या घटनेने क्रिकेट जगतात मोठी खळबळ माजली होती. मात्र आता खरंच सायमंड्सचा अपघाती मृत्यू झालाय की, त्यामागे कोणत कटकारस्थान आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. सध्या त्याच्या मृत्यूबाबत अनेक दावे केले जातायत. मात्र पोलिस तपासात खर कारण समोर येणार आहे.
अँड्र्यू सायमंड्सचा मृत्यू होण्याच्या तासाभरापूर्वी गूढ अधिकच वाढले होते. सायमंड्सची बहीण लुईस सायमंड्सने एका डेलीमेल.को.युकेला दिलेल्या माहितीनूसार, अपघाताच्या रात्री सायमंड्स निर्जन रस्त्यावर काय करत होता असा सवाल तिने उपस्थित केला आहे. यमंड्स तिथे काय करत होते हे आम्हाला माहीत नाही. सायमंड्सचे दोन कुत्रे या अपघातातून बचावले. पुढे लुईस सायमंड्स म्हणाली की, तिला तिच्या भावासोबत आणखी एक दिवस घालवायचा होता, असेही तिने म्हटले होते.
तसेच बेबेथा नेलिमन आणि वेलन टाऊनसन या दोन स्थानिकांनी अपघाताच्या काही मिनिटांतच घटनास्थळ गाठले होते. त्यांना माजी क्रिकेटपटू वाहनात रक्तस्त्राव होत असल्याचे आढळले. दोघांनी सायमंडजवळ जाण्याचा प्रयत्न केला, पण एका कुत्र्याने त्या व्यक्तीला जाऊ दिले नाही.
"कुत्रांपैकी एक अतिशय संवेदनशील होता आणि त्याला सोडू इच्छित नव्हता. जेव्हाही आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा किंवा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचो तेव्हा तो आमच्याकडे फक्त गुरगुरायचा," असे नेलिमनचे म्हणणे आहे.माझ्या जोडीदाराने सायमंड्सला व्यवस्थित बसवता यावे म्हणून कारमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. कारचे पूर्ण नुकसान झाले.
दरम्यान अद्याप अँड्र्यू सायमंड्सच्या निधनामागचं ठोस कारण समोर आले नाही आहे. पोलिस या प्रकरणात तपास करत असून लवकरच कारण समोर येणार आहे.
सायमंड्सची कारकीर्द
सायमंड्सने 198 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5088 धावा केल्या आहेत. यादरम्यान सायमंड्सने 6 शतके आणि 30 अर्धशतके झळकावली. या फॉरमॅटमध्ये अष्टपैलू कामगिरी करताना त्याने 133 विकेट्सही घेतल्या आहेत.
त्याच्या नावावर 26 कसोटीमध्ये 1462 धावा आहेत तसेच 24 विकेटही आहेत. सायमंड्सने 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. देशांतर्गत सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.