मुंबई : ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर खेळाडू अँड्र्यू सायमंड्सचा मृत्यू कार अपघातात झाला. या घटनेनंतर अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामुळे अँड्र्यू सायमंड यांच्या मृत्यूबाबत आता वेगवेगळ्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अँड्र्यू सायमंड्स आपल्या 10 वर्षांच्या चिमुकलीला वाढदिवसाआधी पोरक करून गेला. 18 मे रोजी त्याच्या मुलीचा वाढदिवस होता. मात्र त्याआधीच झालेल्या अपघातात सायमंड्सचा मृत्यू झाला. त्यामुळे चिमुकलीच्या डोक्यावरचं वडिलांचं छत्र हरपलं. 


चिमुकलीच्या वाढदिवसाला आता बाबा नसणार ही भावनाच अंगावर काटा आणणारी आहे. सायमंड्स आणि त्याची पत्नी वेगळे राहात होते. त्यानंतरही दोघं जमेल तसा वेळ चिमुकलीसोबत घालवण्याचा प्रयत्न करायचे. जेव्हा सायमंड्सच्या कार अपघाताची बातमी समजली तेव्हा पत्नी लौरा मुलांसोबत घटनास्थळी आली. 


सायमंड्सच्या अपघाती मृत्यूवर बहिणीने गूढ प्रश्न उभे केले आणि चर्चांना उधाण आलं. या प्रकरणी आता पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. सायमंड्सच्या जाण्याने क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 


सायमंड्सची कारकीर्द 
सायमंड्सने 198 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5088 धावा केल्या आहेत. यादरम्यान सायमंड्सने 6 शतके आणि 30 अर्धशतके झळकावली. या फॉरमॅटमध्ये अष्टपैलू कामगिरी करताना त्याने 133 विकेट्सही घेतल्या आहेत.


त्‍याच्‍या नावावर 26 कसोटीमध्‍ये 1462 धावा आहेत तसेच 24 विकेटही आहेत. सायमंड्सने 14 टी-20 आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. देशांतर्गत सामन्यांमध्येही त्याने चांगली कामगिरी केली आहे.