Angelo Mathews Press Conference : बांगलादेशविरोधात (SL vs BAN) अँजलो मॅथ्यूज (Angelo Mathews) एकही चेंडू न खेळता बाद झाला. टाइम आऊटमुळे (timed out) अँजलो मॅथ्यूज याला बाद देण्यात आले. सदिरा समरविक्रमा बाद झाल्यानंतर अँजलो मॅथ्यूज खेळण्यासाठी मैदानात आला. मात्र, मैदानात आल्यावर मॅथ्यूजने ड्रेसिंग रुममधून हेल्मेट मागवलं. यासाठी दोन मनिटांपेक्षा जास्त वेळ गेला. त्यामुळे बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसन याने (shakib al hasan) पंचाकडे टाईम आऊटची मागणी केली अन् पंचांनी देखील आऊट घोषित केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईमआऊट झाल्यानंतर बाद देण्यात आल्याची ही पहिलीच घटना घडली. सामना झाल्यानंतर यावर अँजलो मॅथ्यूज याने प्रतिक्रिया दिली आहे.


काय म्हणाला Angelo Mathews ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाकिब अल हसन आणि बांगलादेशकडून हे लाजिरवाणं कृत्य होतं. जर त्यांना असे क्रिकेट खेळायचे असेल तर काहीतरी चुकीचे आहे. निव्वळ लाजिरवाणे आहे. आजपर्यंत मला शाकिबबद्दल खूप आदर होता, पण त्याने सर्व गमावले. आमच्याकडे व्हिडीओ पुरावे आहेत, आम्ही ते नंतर मांडू, असं अँजेलो मॅथ्यूज याने म्हटलं आहे. बांगलादेशमुळेच असे घडले, मला वाटत नाही की इतर कोणत्याही संघाने हे केले असेल, असं म्हणत मॅथ्यूजने नाराजी देखील व्यक्त केली आहे. 


तुमच्याच खेळाडूंच्या वर्तनाबद्दल काय? त्यांनी बांगलादेशशी हस्तांदोलन केलं नाही, असा सवाल जेव्हा मॅथ्यूजने विचारला, जर त्यांनी आमचा आदर केला तर आम्ही त्यांचा आदर करू, असं म्हणत मॅथ्यूजने रोखठोक उत्तर दिलं आहे. मी 15 वर्षे खेळलो आहे, मी कधीही संघाला त्या पातळीवर जाताना पाहिले नाही, असं म्हणताना मॅथ्यूजचा चेहरा पडल्याचं दिसतं होतं. 


पाहा Video



श्रीलंका प्लेईंग ईलेव्हन | कुसल मेंडिस (कॅप्टन आणि विकेटकीपर), पथुम निसांका, कुसल परेरा, सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, महेश तीक्षना, दुष्मंथा चमीरा, कसून रजिथा आणि दिलशान मदुशंका.


बांगलादेश प्लेईंग ईलेव्हन | शकिब अल हसन (कॅप्टन), तन्झिद हसन, लिटॉन दास, नजमुल हुसेन शांतो, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्ला, तॉहिद हृदोय, मेहदी हसन मिराझ, तन्झिम हसन साकिब, तस्किन अहमद आणि शोरीफुल इस्लाम.