कोलकाता : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि जगातल्या दिग्गज स्पिनरमधील एक अनिल कुंबळे यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती असेल. हा वाद भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वाईट मानला जाईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण यामुळे अनिल कुंबळेला टीम इंडियाच्या मुख्य कोच पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता ही जुनी गोष्ट झाली आहे आणि कुंबळेच्या जागी रवि शास्त्रीने जागा घेतली आहे. पण आता पुन्हा एकदा अनिल कुंबळे आणि विराट कोहली यांच्यातील हा वाद दोघांनाही पुन्हा आठवणार आहे. 


टीम इंडियाचा माजी कोच अनिल कुंबळे इंडियन स्पोर्ट्स ऑनर्सच्या सर्वोत्कृष्ट कोचच्या शर्यतीत आहे. महत्वाची बाब म्हणजे हा पुरस्कार आरपी-एसजी ग्रुप टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या संस्थेसोबत मिळून देणार आहे. कोहलीसोबत झालेल्या वादामुळे कुंबळेने टीम इंडियाच्या कोच पदाचा राजीनामा दिला होता. या शर्यतीत कुंबळेसोबतच बिशेश्वर नंदी(जिम्नॅस्टीक), बलवान सिंह(कबड्डी), हरेंद्र सिंह(हॉकी) आणि विजय देवेचा(गोल्फ) हेही आहेत. हा पुरस्कार कुणाला मिळेल याची घोषणा ११ नोव्हेंबरला मुंबईत केली जाणार आहे. 


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच हा विवाद सुरू झाला होता. त्यावेळी अनिल कुंबळे टीम इंडियाचा कोच होता आणि कोहली कर्णधार होता. पण दोघांमध्ये वाद इतका वाढला की, कुंबळेने अपल्या पदावरून राजीनामा दिला होता. मानले जात आहे की, कुंबळेने राजीनामा कोहलीच्या कारणाने दिला होता. 


काय होता वाद?


त्यानंतर अनेक बाबी समोर आल्या. मीडिया रिपोर्टनुसार, कोहली आणि कुंबळे यांच्यात वादाची सुरूवात यावर्षी मार्चमध्ये झाली. त्यावेळी ऑस्ट्रेलिया भारत दौ-यावर होता. टेस्ट सीरिजची मॅच धर्मशाला इथे झाला होता. जखमी असल्याने विराट हा सामना खेळला नाही. टीम इंडियाची जबाबदारी अजिंक्य रहाणेवर होती. या सामन्यात कुंबळेच्या म्हणण्यानुसार गोलंदाज कुलदीप यादवला संधी मिळाली. पण कोहलीला वाटत होतं की, सामन्यात अमित मिश्राने खेळावं.