Anushka Sharma आणि Virat Kohli च्या मुलीची पहिली झलक, तुम्ही पाहिली का ?
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या मुलीची पहिली झलक
नवी दिल्ली : विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी आपल्या मुलीची पहिली झलक दाखवली आहे. दोघांनी आपल्या सोशल मीडिया हॅंडलवर आपल्या मुलीचा पहिला फोटो शेअर केलाय. हा फोटो सोशल मीडियावर येताच व्हायरल झालाय.
फोटोमध्ये विराट आणि अनुष्का बेबी गर्लला कडेवर घेताना दिसतायत. दोघांचा फोटो खूप सुंदर दिसतोय. फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडतोय. चाहत्या कमेंटच्या माध्यमातून नव्या पाहुणीवर प्रेमाचा वर्षाव करतायत.