नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा नेहमीच होत असते. दोघांचे एकत्र असलेले फोटोजही अनेकदा सोशल मीडियात समोर आले आहेत. मात्र, आता दोघांच्या लग्नाच्या बातमीने सर्वांनाच एक धक्का दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसांपासून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नाची बातमी प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. विराट आणि अनुष्का डिसेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचं यामध्ये म्हटलं होतं. पण, आता यावर अनुष्का शर्माने आपली प्रतिक्रिया दिली आहे.


विराट कोहलीने केली होती सुट्टीची मागणी


विराटने डिसेंबर महिन्यात बीसीसीआयने सुट्टी मागितली होती. त्यानंतर लग्नाची बातमी समोर आल्याने विविध चर्चांना उधाण आलं. त्यामुळे विराट-अनुष्का डिसेंबर महिन्यात लग्न करणार अशी चर्चा जोरदार रंगली. मात्र, अनुष्काने या सर्व बातम्या अफवा असल्याचं म्हटलं आहे.


जाहिरातीत अनुष्का-विराट एकत्र


नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा एका ब्रँडसाठी एकत्र जाहिरातीत पहायला मिळाले होते. दोघेही आपल्या नात्यासंदर्भात मीडियात कुठलचं वक्तव्य करत नव्हते. मात्र, विराटने आता अनुष्कासोबतच्या नात्यावर बोलण्यास सुरुवात केली आहे. 



अभिनेता आमिर खानसोबत एका स्पेशल शोमध्ये विराट कोहलीने अनुष्का शर्मासंदर्भात भाष्य केलं होतं. विराटने अनुष्काची चांगली सवय सांगितली होती. त्याने म्हटलं होतं की, अनुष्का खूपच प्रामाणिक आहे आणि तिचा प्रामाणिकपणा मला खूपच आवडतो. मात्र, तिचं नेहमी ५ ते १० मिनिटं उशिरा येणं विराटला आवडत नाही.