WPL 2023 : महिला प्रीमियर लीगला (डब्ल्यूपीएल) शनिवारपासून सुरुवात झाली आहे. डब्ल्यूपीएलची  (Women’s Premier League 2023) सुरुवात झाल्याने महिला क्रिकेटच्या नवीन युगाचा प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेत एकूण 21 सामने खेळवण्यात येणार आहेत. पहिल्याच सामन्यात मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघांने गुजरात जायंट्सचा (gujarat giants) पराभव केला आहे. मात्र स्पर्धा सुरु होण्याआधी मोठा दिमाखदार उद्घाटन सोहळा पार पडला आहे. उद्घाटन सोहळ्यात अनेक दिग्गजांची उपस्थिती लावली. या कार्यक्रमात अभिनेत्री कियारा अडवाणी आणि क्रिती सेनने धमाकेदार डान्स केला. यासह कॅनेडियन रॅपर एपी ढिल्लोननेही (AP Dhillon) या कार्यक्रमात गाणं गायलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबी गायक एपी ढिल्लोन हा प्रसिद्ध गायक आहेत. 'ब्राउन मुंडे', 'इन्सेन' आणि 'एक्सक्यूज' यांसारखी लोकप्रिय गाणी त्याने गायली आहेत. त्यामुळे जगभरात त्याचे चाहते आहेत. म्हणूनच एपीला ऐकण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. मात्र एपी ढिल्लोच्या परफॉर्मन्सवरुन सध्या नवा वाद उफाळून आलाय. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटन समारंभात एपी ढिल्लोन परफॉर्म करताना दिसला. यावेळी त्यांनी ब्राउन मुंडे, बहाणे, तेरे ते, पागल या गाण्यांनी त्याने धुमाकूळ घातला. पण काही लोकांना त्याचे गाणे आवडले नाही आणि त्यांनी एपी ढिल्लोनवर गंभीर आरोप केले आहेत.



अनेकांच्या लक्षात आले की एपी ढिल्लोन प्रत्यक्ष कार्यक्रमात गाणे गात नव्हते, तर लिप-सिंक करत होता. हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर सोशल मीडियावर एपी ढिल्लोनला ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर काही युजर्सनी एपी ढिल्लोनला  स्कॅम मॅन म्हटले आहे. एका युजरने  'एपी ढिल्लोन लॉस एंजेलिसहून महिला प्रीमियर लीगच्या उद्घाटन समारंभात लिप-सिंक करण्यासाठी आला होता, असं म्हटलं आहे. तर काहींनी  तो नीट लिप सिंकही करत नसल्याचेही म्हटलं आहे.




 




 दरम्यान, आणखी काही युजर्सनी हा एपी ढिल्लोनचा सर्वात खराब परफॉमन्स असल्याचे म्हटले आहे.