MI vs RCB : तू काय प्रेग्नेंट आहेस का? `तो` फोटो व्हायरल झाल्याने Rohit Sharma सोशल मीडियावर ट्रोल
IPL 2023 MI vs RCB: रोहित शर्माचा एक शॉट मारतानाचा फोटो व्हायरल होतोय. यामध्ये रोहित काही प्रमाणाता जाड झालेला दिसतोय. यावरून रोहितला ट्रोल करण्यात आलंय.
IPL 2023 Match 5, MI vs RCB: मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) चाहत्यांसाठी आनंदाचा दिवस होता. कारण मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2023) आज पहिला सामना खेळवला जातोय. मात्र या सामन्याची खराब सुरुवात पाहता मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) चाहते मात्र काहीसे निराश झालेले दिसले. मुंबईच्या टीमने अवघ्या 20 रन्सवर 3 मोठ्या विकेट्स गमावल्या आणि टीम बॅकफूटवर गेली. यावेळी टीमचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात आलंय.
कर्णधार रोहित स्वस्तात परतला माघारी
रॉयल चॅलेंजर बंगळूरूने (Royal Challengers Bangalore) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान हा निर्णय त्यांच्यासाठी चांगलाच फायदेशीर ठरलेला दिसला. मुंबईने 16 रन्सवर इशान किशन (Ishan Kishan) आणि कॅमेरून ग्रीन (Cameron Green) यांची विकेट गमावली होती. अशा कठीण परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा क्रिजवर होता. त्यामुळे कर्णधाराकडून आज मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तसं झालं नाही. रोहित अवघ्या 1 रन्सवर माघारी परतला आणि चाहते निराश झाले.
सोशल मीडियावर रोहित शर्मा ट्रोल (Rohit Sharma Troll)
रोहित शर्माचा एक शॉट मारतानाचा फोटो व्हायरल होतोय. यामध्ये रोहित काही प्रमाणाता जाड झालेला दिसतोय. यावेळी एका चाहत्याने, सकाळी न्यूजपेपर कसा टाकला जातो, असं म्हणत फोटो पोस्ट केलाय. तर अजून एका चाहत्याने, हा तर वडापाव खाण्याचा रिझल्ट असल्याचं म्हटलंय. इतकंच नव्हे तर रोहित शर्माचा हॅशटॅग वापरून, रोहितने त्याच्या प्रेग्नेंसीवर फोकस केला पाहिजे, असंही एका ट्रोलरने म्हटलंय.
काही चाहत्यांनी, 2 वडापावमध्ये इतकीच बॅटींग होते, असं म्हटलंय. याशिवाय एका ट्रोलरने, ही रोहित शर्माची शेवटची आयपीएल आहे का, असा प्रश्नही केला आहे.