Argentina Won Fifa World Cup 2022: अर्जेंटिनानं 36 वर्षानंतर विश्वचषकावर नाव कोरलं आहे. तसेच मेस्सीचं इतक्या वर्षांची तपश्चर्या फळाला आली. सौदी अरेबियाविरुद्ध साखळी फेरीतील पहिलाच सामना गमवल्यानंतर क्रीडाप्रेमी नाराज झाले होते. स्पर्धेतील सर्वात मोठा उलटफेर म्हणून या सामन्याकडे पाहिलं जात होतं. मात्र अर्जेंटिनानं जोरदार कमबॅक करत साखळी फेरीतून सुपर 16 फेरीत, त्यानंतर उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. अंतिम सामन्यात फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 ने पराभव करून जेतेपदावर नाव कोरलं. असं असताना इथपर्यंतचा प्रवास लियोनेल मेस्सीसाठी (Lionel Messi) सोपा नव्हता, असं म्हणायला हरकत नाही. या विजयानंतर लियोनेल मेस्सीनं भावुक पोस्ट लिहिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"वर्ल्ड चॅम्पियन्स! मी खूप वेळा हे स्वप्न पाहिले, मला त्या स्वप्नानं झपाटलं होतं. माझा अजूनही विश्वास बसत नाही. माझ्या कुटुंबाचे, मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे खूप खूप आभार मानतो. आम्ही पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, साध्य करण्यास आम्ही सक्षम आहोत. हा  वैयक्तिक म्हणण्यापेक्षा संघाचा विजय आहे. ते सर्व अर्जेंटिनांचे स्वप्न होते... आम्ही ते केले!  आम्ही लवकरच एकमेकांना भेटणार आहोत.", अशी इन्स्टाग्राम पोस्ट लियोनेल मेस्सीनं लिहिली आहे. 



बातमी वाचा- Lionel Messi नं वर्ल्डकप ट्रॉफी उचलताना घातलेल्या 'त्या' ड्रेसची चर्चा, जाणून घ्या खासियत


2014 मध्ये लियोनेल मेस्सीला ही संधी चालून आली होती. मात्र अंतिम सामन्यात जर्मनीनं त्याच्या स्वप्नावर पाणी फेरलं. 2018 मध्ये सुपर 16 फेरीत फ्रान्सनं अर्जेंटिनाचा 4-3 ने पराभव केला. त्यामुळे 2022 पर्यंत मेस्सीला वर्ल्डकपची वाट पाहावी लागली. वय 35 वर्षे असल्यानं या विश्वचषकात खेळणार की नाही? यााबाबतही चर्चा रंगली होती. मात्र मेस्सीला फक्त वर्ल्डकप विजयाची स्वप्न पडत होती. कोपा अमेरिका चषकावर नाव कोरल्यानंतर फक्त वर्ल्डकप विजयाचं स्वप्न पूर्ण करणं बाकी होतं. 2022 वर्ल्डकप स्पर्धेत मेस्सीच्या अर्जेंटिना संघानं ते पूर्ण केलं.