मुंबई : यंदाच्या आयपीएलचा सिझन मुंबई इंडियन्सच्या टीमसाठी फार वाईट ठरला. सलग 8 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागल्यामुळे टीमला प्लेऑफमध्ये स्थान मिळालं नाही. दरम्यान प्लेऑफमधून बाहेर झाल्यानंतर मुंबईची टीम काही नव्या खेळाडूंना संधी देतेय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनरायझर्स हैदराबादविरूद्ध नवे चेहरे मुंबईच्या ताफ्यात सामील होते. मात्र यामध्ये अर्जुन तेंडुलकरचा समावेश नव्हता. पण लवकरच त्याचा टीममध्ये समावेश होणार असल्याचे संकेत टीमचा कर्णधार रोहित शर्माने दिलेत.


खुद्द कर्णधार रोहित शर्माने याबाबत वक्तव्य केलं आहेय. रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर आता अर्जुन तेंडुलकर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात पदार्पण करू शकतो अशी अटकळ बांधली जातेय. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या टॉसदरम्यान रोहित शर्मा म्हणाला की, आम्ही सतत नवीन खेळाडूंना संधी देत ​​आहोत, जेणेकरून पुढील सिझनसाठी गोष्टी स्पष्ट करता येतील.


रोहित शर्माने सांगितलं की, या सामन्यात मयंक मार्कंडेय आणि संजय यादव यांना खेळण्याची संधी देण्यात आली आहे. तर शेवटच्या सामन्यातही काही नवीन खेळाडूंना संधी दिली जाणार आहे. मुंबई इंडियन्सला या सिझनमधील शेवटचा सामना 21 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळायचा आहे.


रोहित शर्माच्या वक्तव्यानंतर अर्जुन तेंडुलकर ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध अर्जुन तेंडुलकरचं पदार्पण निश्चित असल्याचा अंदाज यावेळी युझर्सकडून लावण्यात आला आहे. अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने 30 लाख देत आपल्या ताफ्यात घेतलं होतं.


गेल्या सिझनमध्येही अर्जुन तेंडुलकरला 20 लाख रुपयांना विकत घेतलं होतं, पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही. पुढच्या सामन्यात त्याला संधी दिली नाही तर या सिझनमध्येही तेच घडणार आहे.