IPL 2023 : सचिन तेंडुलकरच्या लेकाकडून कॅमेरामनला शिवीगाळ? Video Viral
Arjun Tendulkar Abusing : आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर 14 धावांनी विजय मिळवला. या सामन्यानंतर अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अर्जुनने कॅमेरामनला शिवीगाळ दिली असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Sunriser Hyderabad Vs Mumbai Indians IPL 2023 : भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने नुकतेच कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएलमध्ये (IPL 2023) पदार्पण केले. या सामन्यानंतर काल (18 एप्रिल 2023) अर्जुनने आपला दुसरा आयपीएल सामना मुंबई इंडियन्सकडून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (Sunriser Hyderabad Vs Mumbai Indians) खेळला. ज्यामध्ये त्याची कामगिरी जबरदस्त होती. अर्जुन तेंडुलकरच्या पाचव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारला रोहित शर्माने झेलबाद केलं आणि सनरायझर्स हैदराबादच्या डाव आटोपात आणला.
अर्जुन तेंडुलकरने 2.5 शतकांमध्ये 18 धावा दिल्या असूव अर्जुनने तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आयपीएलच्या दुसऱ्या सामन्यात आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. पण या सगळ्यात आता अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून चाहत्यांचे म्हणणे आहे की, सचिनच्या मुलाने कॅमेरामनला शिवीगाळ केली आहे. नेमकं व्हायरल व्हिडीओ मागचे काय सत्य आहे? ते जाणून घेऊया...
वाचा: IPL मध्ये टॉपचे संघ भिडणार; राजस्थानमसोर अग्रस्थान कायम ठेवण्याचं आव्हान, अशी असेल Playing 11
मुंबई इंडियन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादला या आयपीएलच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) अप्रतिम कामगिरी करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो व्हिडिओ मुंबई इंडियन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यामधला आहे. अर्जुनचा व्हायरल व्हिडिओ हा मुंबईच्या इनिंगचा आहे. अर्जुन डगआउटमध्ये बसलेला दिसत आहे. तेवढ्यात कॅमेराने अचानक त्याच्यावर लक्ष केंद्रित केले. यानंतर अर्जुन सहकारी क्रीडापटू रागाने काहीतरी सांगताना दिसत आहे. अर्जुनच्या लिप सिंकवरुन कॅमेरामनला शिवीगाळ केल्याचा अंदाज सोशल मीडियावर युजर्स लावत आहे. यावर कंमेट देताना एका युजर्सने म्हटले की, मी अर्जुनला शिवीगाळ करताना पाहीलं, तर दुसऱ्या युजर्सने म्हटलं की, जेव्हा कॅमेरा अर्जुनवर गेला, तेव्हा तो मला जाणूनबुजून दाखवतो, असे म्हटले आहे...
दरम्यान मुंबई इंडियन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना रोमांचक झाला. हा सामना मुंबईने 14 धावांनी जिंकला. शेवटच्या डावात हैदराबादला विजयासाठी 20 धावा हव्या असत्या, पण अर्जुनने शानदार गोलंदाजी केली. अर्जुनने आयपीएलमध्ये पहिली विकेट घेऊन त्याने सामन्यात 2.5 षटकार मारले आणि 18 धावा दिल्या.